ताज्याघडामोडी

चिमुकल्या तीराला वाचवण्यासाठी 16कोटी उभारले सीमा शुल्कामुळे उपचाराला उशीर आई वडिलांची धडपड सुरूच

घरात एखादं बाळ जन्माला आल्यानंतर आई-वडिलांसह घरच्या मंडळींना होणारा आनंद कधीच शब्दात मांडता येणार नाही. कामत कुंटुबातही असाच काही माहोल होता. मोठे आणि सुंदर डोळे, गुलाबी गाल, लोभस चेहरा आणि गोड हसू असलेल्या तीराचा जन्म झाल्यानंतर कामत कुटुंब आनंदी होतं. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण अवघ्या 5 महिन्यांच्या तीराला स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA) हा दुर्धर आजार झाल्याचं निष्पण्ण झालं. या आजारावर भारतात ठोस उपाय नाही. त्यासाठी लागणारी औषधं अमेरिकेत मिळतात आणि त्याची किंमतही सामान्य नागरिकाला कधीही न परवडणारी अशी असल्याचं तीराच्या आई-वडिलांना समजलं.

कारण, या आजारावरील उपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनची किंमत आहे तब्बल 16 कोटी रुपये.
लेकीला वाचवायचं आहे. तिला हे जग दाखवायचं आहे. त्यासाठी तीराचा आई-वडिलांनी क्राऊड फंडिंगचा पर्याय निवडला. त्यासाठी कामत कुटुंबियांना अनेक दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्थांनी मदत केली. त्यातून त्यांनी ती रक्कमही उभा केली. पण आता एक वेगळीच अडचण या कुटुंबियांसमोर उभीर राहिली आहे. कारण, अमेरिकेतून हे औषध भारतात आणण्यासाठी कस्टम ड्यूटी अर्थात सीमा शुल्क लागणार आहे. त्यासाठी थोडेथोडके नाही तर 2 ते ५ कोटी रुपये लागू शकतात. त्यासाठी क्राऊड फंडिगची मोहीम अद्यापही सुरु ठेवली आहे. दरम्यान, कामत कुटुंबाने हे सीमा शुल्क माफ करण्यासाठी केंद्र सरकारकडे विनंती अर्ज केला आहे.

चिमुकल्या तीरावर सध्या हाजीअली इथल्या एसआरसीसी या लहान मुलांच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण मागील आठवड्यापासून तीराची प्रकृती नाजूक बनली आहे. त्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. अशा स्थितीत तीराला लागणारे औषध तत्काळ मिळण्याची गरज डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी रुग्णालयाकडून पत्रव्यवहारही सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *