

पंढरपूर ‘बसपा’कडून ‘पालवी’ येथे ‘मायावती’ यांचा वाढदिवस साजरा..
पंढरपूर प्रतिनिधी
बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावती यांचा जन्म दिवस मोठ्या उत्साहात देशभर साजरा केला जातो. बसपाकडून पंधरा जानेवारी हा दिवस जन कल्याणकारी दिन म्हणून ही साजरा केला जातो. कोरोना कालावधीतही महाराष्ट्रात सामाजिक बांधिलकीतून मायावती यांचा जन्म दिवस मोठयाप्रमाणात साजरा करण्यात आला. याचाच एक भाग म्हणून पंढरपूर मंगळवेढा विधान सभा युनिटने पंधरा जानेवारी रोजी पंढरपूरात एड्सग्रस्त मुलांचे आश्रयस्थान असलेल्या पालवी संस्थेत मोठ्या आनंदाने राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अनाथ, असाहाय्य, दुर्लभ, उपेक्षित मुलांना फलाहार व अल्प अर्थ सहाय्य करण्यात आले. पालवी संस्थेतील मुलांकडून केक कापून मायावती यांचा जन्म दिन साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेच्या संचालिका डिंपल घाडगे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली, भविष्यात पालवी संस्थेकडून मानसिक दृष्ट्या दुर्लभ व अनाथ लोकांसाठी मोठे आश्रयस्थान उभे केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी एल.एस.सोनकांबळे, रवी सर्वगोड, भालचंद्र कांबळे, गौतम साबळे, अॅड.येडगे,अॅड.राहुल भोसले, अरुण कांबळे, सामाधान पारसे, अब्दुलमंजिद मणेरी, नाथा बाबर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.