

पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक आज निवडणूक अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर बिनविरोध झाल्याने धाराशिव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी जाहीर केलेले ज १ लाखाचे बक्षिस पटकाविले आहे.जैनवाडी ग्रामपंचायत बिनविरोध नऊ नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा अभिजित पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला असून जैनवाडी गावाच्या एकोप्यासाठी निवडणूक बिनविरोध करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे त्यांनी आभार मानले. नवनिर्वाचित सदस्य दीपकदादा पवार, मधुराताई पवार, हणमंत सोनवले, संगीताताई गोफणे, कल्पनाताई माने, रुक्मिणीताई गोफणे, शोभाताई गोफणे, कल्पनाताई शिंगटे, अशोक सदलगे यांचे चेअरमन अभिजित पाटील यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.हि ग्रामपंचायत बिनविरोध एकोप्यासाठी एकत्रित करणारे दामोदर पवार,किरण दानोळे, अशोक मिरजे, अप्पासाहेब दानोळे, हिम्मत हासुरे, महादेव लिंगडे, विजय साळवे, मोहन माने, हणमंत सोनवणे, विलास गोफणे, मच्छिंद्र गोफणे, जालिंदर गोफणे आदी मान्यवर तसेच गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.