

पुणे जिल्ह्याचं नामकरण संभाजीनगर करण्याची मागणी आंबेडकर यांनी केली आहे.संभाजी महाराज आणि पुण्याचं नातं आहे.औरंगाबाद आणि संभाजी महाराज यांचा थेट असा फारसा संबंध नाही.पुणे जिल्ह्यात संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील वडूज गावात त्यांची समाधी आहे. त्यामुळे संभाजी महाराजांचं स्मरण राहावं, असं वाटत असेल तर पुण्याचे नाव बदलून संभाजीनगर करा अशी मागणी ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.औरंगाबादच्या नामांतरावरून सध्या राज्यात सुरु असलेल्या चर्चेच्या पार्शवभूमीवर त्यांनी हे भाष्य केले आहे.
पाच वर्ष सरकारमध्ये असताना भाजपा-शिवसेनेनं औरंगाबाद शहराचं नाव का बदललं नाही असा सवाल उपस्थित करीत औरंगाबादचं नाव बदलून ते संभाजी नगर करण्यास प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप नोंदवला. ‘औरंगाबाद ऐवजी पुण्याला संभाजी महाराजांचं नाव द्यायला हवं. औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर आहे. मुघलांच्या काळात औरंगाबाद दुसरी राजधानी होती. औरंगाबाद ऐतिहासिक शहर आहे आणि त्याचं ऐतिहासिक महत्त्व कायम राहायला हवं अशी भूमिका ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे.