Uncategorized

गादेगाव येथील रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी विवेक चव्हाणची नवोदय साठी निवड

पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील रयत शिक्षण संस्थेत इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विवेक प्राण चव्हाण,आणि समर्थ रिड्डे यांची केंद्रीय नवोदय साठी निवड झाली आहे.ग्रामीण भागातून खुल्या प्रवर्गातून सातव्या क्रमांकाने विवेकची निवड झाली आहे. विवेकचे प्राथमिक शिक्षण गादेगाव येथे झाले.त्याच्या या यशामध्ये प्रशालेतील मुख्याध्यापिका श्रीमती शिवशरण मॅडम,पाचवीच्या वर्गशिक्षिका रुपाली जाधव तसेच त्याचे मामा अमोल जाधव, गणेश जाधव(पळशी)यांचे मोलाचे सहकार्य लाभले.लहान असतानाच वडिलांचे छत्र हरवलेल्या विवेकाच्या आई कोर्टी रस्त्यावरील शासकीय वसाहत श्रीनगरी येथे शिकवणी घेऊन आपल्या दोन मुलांचे शिक्षण संगोपन करीत आहेत.त्यांनी स्वतःही अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या पण तेच ध्येय समोर ठेवून त्यांनी स्वतःच्या मुलाची जिद्दीने परीक्षेची तयारी करून घेतली आहे.या दोन्ही विद्यार्थ्यांनी प्रथमच गादेगाव येथून निवड झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *