Uncategorized

स्वेरी फार्मसीच्या राजश्री मुळे यांना प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

कोडोली (ता. पन्हाळा) येथील वासंतीदेवी पाटील इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी व असोसिएशन ऑफ कम्युनिटी फार्मासिस्ट ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्य स्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत स्वेरी फार्मसीच्या राजश्री मकरध्वज मुळे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

            ‘सोशल अँड कम्युनिटी फार्मसी‘ या विषयावर या राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्याचा निकाल नुकताच लागला असून यामध्ये गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डी. फार्मसीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या राजश्री मकरध्वज मुळे यांच्यासह स्वेरीच्या इतर विद्यार्थिनींनी देखील सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये राज्यातून जवळपास ३०० ते ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामधून स्वेरी फार्मसीच्या राजश्री मुळे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तसेच स्वेरी फार्मसीच्याच प्रेरणा लोकरेआश्विनी लोकरेनिर्जला पाटीलयशश्री यादवकोमल खरातस्नेहल पाटीलआश्विनी यादवश्रद्धा मानेआरती मेटकरी व रुपाली राऊत या दहा विद्यार्थीनींनी देखील सहभाग घेतला. त्यांना प्राचार्य डॉ. मिथुन मणियार व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेतील विजेत्या राजश्री मुळे यांना प्रमाणपत्रसन्मानचिन्ह आणि रोख रु. ३ हजार बक्षीस देण्यात आले तर सहभागी विद्यार्थिनींना प्रमाणपत्रे देण्यात आली. प्रथम क्रमांक मिळविल्यामुळे स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगेसंस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदेउपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व फार्मसीचे प्रभारी प्राचार्य डॉ. मिथुन मणियारस्वेरीचे कॅम्पस इन्चार्जस्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्यइतर प्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारीविद्यार्थी व पालकांनी राजश्री मुळे यांच्यासह सहभागी विद्यार्थीनींचे अभिनंदन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *