Uncategorized

युटोपियन शुगर्स १.६२ कोटी लिटर इथेनॉल चा पुरवठा करणार – रोहन परिचारक

युटोपियन शुगर्स लि. कारखान्याने गळीत हंगाम २०२१-२०२२ मध्ये ६.५० लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्धीष्ट ठेवले आहे. कारखान्याने दि.२ जानेवारी २०२२ अखेर ३,११,००० मे.टन गाळपाचा टप्पा पूर्ण केला आहे. कारखान्याचे केंद्र शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत राष्ट्रीय स्तरावरील इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रॅम  मध्ये सहभाग घेतला असून सुमारे १.६२ कोटी लिटर  इथेनॉल चा पुरवठा पेट्रोलियम कंपन्या यांचे कडे करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांनी दिली.

कारखान्याने पेट्रोलियम कंपनी यांचेकडे १.६४ कोटी लिटर ची निविदा भरलेली होती. ऊसाच्या रसापासून  इथेनॉल  निर्मिती व पुरवठा करणे कामी ४१ लाख लिटर इतक्या निविदेस मान्यता दिली आहे तसेच बी-हेवी मोलॅसेस पासून सुमारे १.२१ कोटी लिटरचा पुरवठा हिंदुस्थान पेट्रोलियम,भारत पेट्रोलियम व इंडियन ऑइल कंपनी यांचेकडे करण्यात येणार आहे. आता पर्यंत सुमारे २६ लाख लिटर चा इथेनॉल पुरवठा करण्यात आला आहे. ऊसाच्या रसापासून  इथेनॉल निर्मिती करताना १.३० इतकी रिकव्हरी खर्च होत आहे. तसेच बी हेवी मोलॅसेस पासून १.३५ टक्के इतकी रिकव्हरी खर्च होत आहे त्यामुळे सध्याचा साखर उतारा हा ६.९२ आहे व एकत्रित मिळून साखर उतारा ९.५७%  इतका प्राप्त होत आहे. इथेनॉल विक्री मधून मिळणार्‍या रकमेमधून ऊस उत्पादक यांना वेळेत ऊस बिल रक्कम अदा करणे पुढील काळात शक्य होणार आहे. कारखान्याच्या वतीने  जानेवारी व फेब्रुवारी मध्ये लवकरच प्राप्त होणार्‍या ८००५ व ८६०३२ या जातीच्या बेण्यावर प्रती एकरी ५०% अनुदान देण्यात येणार आहे अशी माहिती ही श्री.परिचारक यांनी दिली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *