ताज्याघडामोडी

पंढरपूर येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

पंढरपूर येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

पढरपूर, दि. 24 : ग्राहकांना त्यांचे हक्क व कर्तव्य याची माहिती व्हावी यासाठी प्रत्येक वर्षी 24  डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येतो. तहसिल कार्यालय  पंढरपूर  व अखिल भारतीय ग्राहक पंचायत पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिन तहसिल कार्यालय पंढरपूर येथे साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास नायब तहसिलदार पंडीत कोळी, पुरवठा अधिकारी सदानंद नाईक, पुरवठा निरिक्षक राहुल शिंदे, आखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीचे प्रांताध्यक्ष सुभाष सरदेशमुख, जिल्हा संघटक शशिकांत हरिदास, तालुका अध्यक्ष आण्णा ऐतवाडकर, उपाध्यक्ष पांडूरंग आल्हापूरकर यांच्यासह तालुक्यातील सर्व ग्राहक पंचायत कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

प्रत्येक व्यक्ती हा प्रथम ग्राहक  असून, ग्राहक हा जागृत व्हावा , ग्राहकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आलेला आहे. ग्राहकांकडून ऑनलाईन खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. या ऑनलाईन खरेदीमध्ये  ग्राहकांची फसवणूकीच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी समोर येत आहेत. यासाठी शासनाने ग्राहक संरक्षण कायद्यातंर्गत नवीन ई-कॉमर्स नियम लागू केले आहेत.

यावेळी कोरोना संसर्ग कालावधीमध्ये गरीब व गरजू लोकांना जीवनाश्यक वस्तू पोहचवल्याबद्दल तसेच त्यांना अत्यावश्यक शासकीय कामकाजात मदत केल्याबद्दल कोरोना  योध्दांचा सत्कार करण्यात आला. तसेच या ग्राहकांना उत्कृष्ट बँकींग सेवा दिल्याबद्दल बॅक ऑफ इंडीया शाखा पंढरपूर येथील अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.  कोरोना संसर्ग काळात तालुक्यातील स्वस्त भाव दुकानदारांनी गरीब व गरजू नागरिकांना उत्कृष्ट सेवा दिल्या बद्दल स्वस्त धान्य दुकानदार यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *