ताज्याघडामोडी

पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा चिंताजनक वाढ

सोलापूर जिल्ह्यात नव्याने कोरोना बाधितांचे प्रमाण काहीसे घटले असताना पंढरपुर शहर व तालुक्यात मात्र कोरोना बाधितांची संख्या वाढतेच आहे.गेल्या तीन दिवसात पंढरपुर शहरात नव्याने बाधित होणाऱ्यांची संख्या काहीसी घटू लागल्याचे चित्र होते मात्र आज त्यात पुन्हा वाढ झाली असून आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार पंढरपुर शहर ८८ तर तालुक्याच्या ग्रामीण भागातून २८१ इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित आढळले आहेत.तर ७ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.शहर तालुक्यातील ३१६४ कोरोना बाधितांवर सध्या उपचार सुरु आहेत.आणि हा आकडा देखील जिल्ह्यात सर्वाधिक आहे.

पोटनिवडणुकीचा परिणाम म्हणून वाढत चाललेली कोरोना बधितांची संख्या १० मे नंतर काहीशी आटोक्यात येईल असा अंदाज व्यक्त केला जात असतानाच तालुक्यात दरदिवशी नव्याने आढळून येणाऱ्या बाधितांमुळे परिस्थिती गंभीर होत चालली असून.शहरातील सर्व ऑक्सिजन,व्हेंटिलेटर बेड उपलब्ध असलेले हॉस्पिटल  फुल्ल आहेत.बेड रिकामा होण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे.तर कोविड केअर सेंटर मध्ये देखील मोठ्या प्रमाणात बाधितांवर उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *