ताज्याघडामोडी

खा.शरद पवार शुक्रवार दि.१८ डिसेंबर रोजी सरकोलीत येणार

       पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार स्वर्गीय भारत भालके यांच्या निधनाने केवळ कुटुंबीयांवर नव्हे तर पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील आमदार भालके प्रेमी जनतेवर कार्यकर्त्यांवर खूप मोठा आघात झाला आहे. स्वर्गीय आमदार भारत नाना यांच्या निधनानंतर बालके परिवाराच्या सांत्वनपर भेटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे शुक्रवार दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता सरकोली येथे येणार आहेत.
        आमदार भारत भालके यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सातत्याने लक्ष ठेवून होते. आमदार भारत नाना भालके हे कोरोना मुक्त होऊन डिस्चार्ज घेऊन सरकोली येथे आल्यानंतर शरद पवार यांनी स्वर्गीय भारत नानांना फोन करून प्रकृतीची काळजी घेण्याबाबत सल्लाही दिला होता मात्र पुन्हा आमदार भारत भालके यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना पुणे येथे रुबी हॉल क्लिनिक मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले स्वर्गीय भारतनानांची प्रकृती 26 नोव्हेंबर रोजी आणखी गंभीर असल्याचे समजतात शरद पवार यांनी थेट मुंबईहून एका डॉक्टरांच्या पथकास स्व.आमदार भालके यांच्या उपचारावर देखरेख ठेवण्यासाठी बोलवले होते. 27 नोव्हेंबर रोजी शरद पवार यांनी स्वतः रूबी हॉल क्लिनिक येथे जाऊन स्वर्गीय आमदार भारतनाना यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली होती. मात्र दुर्दैवाने पुढे आमदार भारतनानांची प्रकृती उपचारास साथ देईनाशी झाली आणि रात्री उशिरा त्यांचे निधन झाले.
   
        स्वर्गीय आमदार भारत नानांच्या पार्थिवावर सरकोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी खासदार शरद पवारही उपस्थित राहू शकले नाहीत. आता शुक्रवारी ते भालके कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी सरकोली येथे येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *