यमाई ट्रॅकवर फिरायला जाताय तर आपली दुचाकी सांभाळा !
ट्रॅकवर फिरायला आलेल्या तरुणाची दुचाकी लंपास
यशवंतराव चव्हाण तलाव परिसरात सीसीटीव्ही निगरानीची गरज
पंढरपूर शहरातील यशवंतराव चव्हाण जलाशय अर्थात यमाई ट्रॅक परिसर हा पंढरपूरकरांच्या दृष्टीने अतिशय जिव्हळ्याचा परिसर ठरला असून सकाळ आणि सायंकाळच्या वेळेस आरोग्याबाबत जागरूक असलेले शेकडो लोक या ठिकाणी फिरण्यासाठी,व्यायामासाठी येत असतात त्याच बरोबर या ठिकाणी असलेल्या तुळशी वृंदावनामुळे येथे दिवसभर पर्यटकांचा,भाविकांचा वावर असतो.येथे येणारे शहरातील नागिरक मोठ्या प्रमाणात दुचाकी घेऊन येत असल्यामुळे दुचाकी चोरासाठी हा ठिकाण एक संधी झाले आहे.हा प्रवेशद्वाराचा परिसर व आतील संपूर्ण ट्रॅक सीसीटीव्ही निगराणी खाली आणला गेला पाहिजे अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत आली आहे.या ठिकाणाहून दुचाकी चोरीस जाण्याच्या घटना अनेकवेळा घडल्या असून २८ नोव्हेंबर रोजी ट्रॅकवर फिरायला आलेल्या युवराज गायकवाड वय-28वर्षे, धंदा-खाजगी नोकरी(कापड दुकान),रा-संतपेठ, महापूर चाळ, सांगोला रोड पंढरपूर या युवकाची हिरो होंडा स्प्लेंडर आर.टी.ओ. क्र.MH13BB3055 हि दुचाकी चोरटयांनी सकाळच्या वेळेस लंपास केली आहे.
या घटनेमुळे यमाई ट्रॅकवर व्यायामासाठी नियमितपणे दुचाकी घेऊन येणाऱ्या नागिरकांमधून चिंता व्यक्त होत असून येथून होणाऱ्या मोटारसायकल चोरीचे सत्र रोखण्यासाठी पंढरपूर नगर पालिकेने सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्याबरोबरच हा परिसर सीसीटीव्हीच्या निगराणी खाली आणण्यासाठी तत्काळ उपायोजना करावी अशी मागणी होताना दिसून येत आहे.
