शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल 10 जानेवारीला घोषित करण्यात आला. निवडणूक आयोगाप्रमाणेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुद्धा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाचा असल्याचा निर्णय दिला होता.
मात्र या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्ययायालयात धाव घेतली होती. उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला नोटीस बजावली आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर काही आमदारांना नोटीस बजावली आहे. राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला उद्धव गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.