ताज्याघडामोडी

विना अनुदानीत मध्ये हाल सोसणारे शिक्षक राजकीय पक्षांना मतदान का बरं करतील?

विना अनुदानीत मध्ये हाल सोसणारे शिक्षक राजकीय पक्षांना मतदान का बरं करतील?

डॉ. निलकंठ खंदारे यांचा सवाल

गेली २० वर्ष विना अनुदानित शाळा महाविद्यालयात काम करणारे शिक्षक प्राध्यापक अत्यंत दयनीय अवस्थेत जीवन व्यथित करत आहेत त्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा उघड्या डोळ्यांनी राज्यकर्ते पाहत राहिले. ना त्यांच्या बद्दल कणव ना कळवळा ना त्यांच्या मुलाबाळांच्या भविष्याची चिंता राज्यकर्त्यांनी केली. त्यांचे आयुष्य ज्यांनी कवडीमोल केले त्या राजकीय पक्षांना पुणे पदवीधर निवडणुकीत अजिबात मतदान मिळणार नाही असे प्रतिपादन निलकंठ खंदारे यांनी केले.
डॉ खंदारे पुढे म्हणाले हा विना अनुदानित शिक्षक वर्ग हा सर्वात अधिक शोषित असून मी त्या प्रश्नावर अत्यंत संवेदनशील रित्या पाहत आहे मात्र केवळ राजकीय अजेंडा राबवून हे प्रश्नच पुढे येऊ द्यायचे नाहीत हे धोरण ठेवल्याने अशा राजकीय पक्षाच्या उमेदवारांना विना अनुदानित शिक्षक अजिबात मतदान देणार असे आपण जिथे जाईल तिथल्या शिक्षकांनी सांगितले आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघात प्रश्नांची मालिका तशीच असून यासाठी प्रामाणिक प्रयत्न पदवीधर आमदारांकडून केले गेले नाहीत, आपण निवडून आल्यास विना अनुदानित शिक्षकांचे प्रश्न घेऊन लढणाऱ्या शिक्षक आमदारासोबत आपण हा प्रश्न सोडविण्यासाठी सगळी शक्ती पणास लावून त्यांना न्याय मिळवून घेण्याची आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. निलकंठ खंदारे यांनी पुन्हा एकदा दौरा सुरू केला असून होम टू होम मतदार संपर्क सुरू आहे. त्यांना पुणे पदवीधर मतदार संघात मोठया प्रमाणात पाठिंबा वाढत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *