गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

2 वेळा आमदार, भरदिवसा झाडल्या 40 गोळ्या

इंडियन नॅशनल लोक दलचे (INLD) प्रदेशाध्यक्ष आणि बहादुरगडचे माजी आमदार नफे सिंग राठी यांच्यावर गोळीबार झाला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. रविवारी राठी यांची हत्या झाली. या घटनेच्या 24 तासांनंतर पोलिसांकडून मोठी माहिती मिळाली आहे. नफे सिंह यांची हत्या कुणी केली, याबाबत पोलिसांनी मोठी माहिती दिली आहे.

नफे सिंह राठी यांची गाडी बराही फाटकाजवळून जात असताना रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनावर गोळीबार केला. या घटनेत राठी यांच्यासह चार जण जखमी झाले. गोळीबारात जखमी झालेले इतर तीन जण राठी यांचे सुरक्षा कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार हल्लेखोर आय-10 वाहनात आले होते. त्यांनी राठी यांच्या वाहनांवर गोळ्या झाडल्या. गोळ्यांचा आवाज ऐकून स्थानिक लोक तेथे जमा झाले. या घटनेचे फुटेज समोर आले असून त्यात कारमध्ये चारही बाजूंनी गोळ्या झाडल्या गेल्या आहे. कारला चारही बाजूंनी गोळ्यांचे छिद्र पडले आहेत.

राठींसह सर्व जखमींना ब्रह्मशक्ती संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, नाफे सिंग यांच्या मानेवर, कंबरेत आणि मांडीवर अनेक गोळ्या लागल्या होत्या. आणखी एकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, तर अन्य दोन जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.

दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. झज्जरचे एसपी अर्पित जैन यांनी आपल्या प्राथमिक निवेदनात सांगितले की, “आम्हाला गोळीबाराची माहिती मिळाली आहे. सीआयए आणि एसटीएफ काम करत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पथक रवाना झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *