ताज्याघडामोडी

२५/११/२०२० ते दि.२७/११/२०२० या यात्रा कालावधीत श्रीं विठ्ठलाचे मुखदर्शन बंद

२५/११/२०२० ते दि.२७/११/२०२० या यात्रा कालावधीत श्रीं विठ्ठलाचे मुखदर्शन बंद

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मा.राज्य शासनाने दि.१४/११/ २०२० रोजी राज्यातील सर्व मंदिरे
भाविकांना दि.१६/११/२०२० पासून दर्शनासाठी खुले करून देणेबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार श्री विठ्ठल
रूक्मिणी मातेचे फक्त मुखदर्शन देण्याच्या दृष्टीने भाविकाना ऑनलाईन दर्शन प्रणाली ही सुविधा उपलब्ध करून
दिली आहे. त्यासाठी मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून भाविकांना ऑनलाईन बुकींग करणे अनिवार्य आहे

त्याप्रमाणे दैनंदिन जास्तीत जास्त २००० भाविकांना दर्शनाचा लाभ देण्यात येत आहे.

ऑनलाइन पास बुकिंग आजपासून खुले करण्याचा व कार्तिकी यात्रा २०२० ला विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रतिकात्मक व मर्यादित स्वरूपात साजरी करण्यात येत आहे. याशिवाय दि.२५/११/२०२० व दि २६/११/२०२० रोजी पंढरपूर शहर व परिसरात संचारबंदी असल्याने दि.२५/११/२०२० ते दि.२७/११/२०२० या यात्रा कालावधीत श्रींचे मुखदर्शन बंद॒ ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. तसेच दि.२८/११/ २०२०

पासून पुढे ऑनलाईन मुखदर्शनपास बुकींग बाबत स्वतंत्र वेळापत्रक जाहिर करण्यात येईल. दि.२३ व
२४/११/२०२० रोजीचे ऑनलाईन मुखदर्शन पाससाठी निश्‍तिच करण्यात आलेले आहेत

 सदरचे पत्रक श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरचे मा. सदस्य महोदय आ.रामचंद्र कदम, श्रीमती

शकुंतला नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, श्री.भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, श्री.संभाजी शिंदे, आ.सुजितसिंह
ठाकूर, ह.भ.प ज्ञानेशवर देशमुख (जळगांवकर), अँड माधवी निगडे, ह.भ.प प्रकाश जवंजाळ, श्री.अतुलशास्त्री भगरेगुरूजी, ह.भ.प शिवाजीराव मोरे, सो.साधना भोसले यांचेशी विचारविनियम करून एकमताने निर्णय घेतल्यानंतर मा.

सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *