ताज्याघडामोडी

कृषि उत्पन्न बाजार समिती, पंढरपूर जिल्हा सोलापूर. कार्तिक यात्रा – २०२० कालावधीत भरणारा जनावरांचा बाजार ल॑पी स्कीन डिसीज रोगाचा प्रादुर्भाव व कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखणेसाठी रद्द

कार्तिक यात्रा – २०२० कालावधीत भरणारा जनावरांचा बाजार ल॑पी स्कीन डिसीज रोगाचा प्रादुर्भाव व कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखणेसाठी रद्द

सोलापूर जिल्हया मधील जनावरांमध्ये ल॑पी स्कीन डिसीज या विषाणुजन्य त्वचा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. सदर आजार संसर्गजन्य असल्याने हया रोगाचा प्रसार हा बाधीत जनावरांपासून निरोगी जनावरांना स्पर्शाद्वारे, बाहयकिटकाद्वारे, लाळ व स्त्राव इत्यादी माध्यमातून होतो. सदर रोगाच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे सद्यस्थितीत आवश्यक आहे. सोलापूर जिल्हा “नियंत्रीत क्षेत्र घोषीत केलेला असुन गोजातीय जनावरांना ने-आण करण्यांस मनाई, प्राण्यांचे बाजार भरवणे, प्राण्यांचे शर्यती लावणे, प्राण्यांचे जत्रा भरविणे, प्राण्यांचे प्रदर्श आयोजीत करणे आणि प्राण्यांचे गट करून किंंवा त्यांना एकत्रीत करून अन्य काम पार पाडणे यांस महाराष्ट्र शासन अधिसुचना दि.२१/९/ २०२० नुसार माजिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सोलापूर यांचे कडील जा.क.जिपउआ/ सो/ तां/ एहएसडी/ ४३७८/२०२० सोलापूर-०४ दि.२९/१०/२०२० रोजीचे पत्राने मनाई करणेत आलेली असुन जनावरांचा बाजार बंद करणे विषयी उचित कार्यवाही करणे बाबत कळविलेले आहे. तसेच कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखणे साठी शासनाकडुन दि.३०/११/२०२० पर्यंत लॉकडाउनची बंधने लागू केलेली आहेत. त्यामुळे दि २२/११/२०२० ते दि.२८/११/२०२० अखेर कार्तिक यात्रा कालावधी मध्ये भरणाऱ्या जनावरे बाजारात मोठया प्रमाणात होणाऱया गर्दीमुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कार्तिक यात्रा कालावधीत भरणारा जनावरांचा बाजार या बाजार समितीच्या वतीने रदद करण्यांत येत आहे.तरी सर्व शेतकरी, पशुपालक, जनावरांचे व्यापारी व संबंधीत घटकांनी कार्तिक यात्रा जनावराच्या बाजारात कूपया आपली जनावरे खरेदी-विकीसाठी आणु नयेत. याची नोंद घ्यावी व बाजार समितीस सहकार्य करावे असे आवाहन बाजार समितीचे सभापती मा.श्री. दिलीप (आप्पा) तुकाराम घाडगे व उपसभापती मा.श्री विवेक (काका) देविदास कचरे यांनी केले आहे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *