ताज्याघडामोडी

अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेस संघटना पंढरपूर मागण्या मान्य

अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेस संघटना पंढरपूर मागण्या मान्य

पंढरपूर-अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेस संघटना पंढरपूर शाखा यांच्यावतीने दि.26/10/2020 रोजी कर्मचाऱ्यांच्या 1 ते 8 मागण्यांसंदर्भात पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व नगराध्यक्ष यांना खालील मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले होते. सदरच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. 

  • 1) दिवाळी सणानिमित्त प्रत्येक कामगारांना 30 हजार रूपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे. 2) सातव्या वेतनाचा फरकाचा पहिला हप्ता देण्यात यावा. 3) कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता लागू करावा. 4) दिवाळी ऍडव्हान्स शासन निर्णयाप्रमाणे 12500 रू.देण्यात यावा. 5) सेवानिवृत्त व मयत सेवकांच्या वारसांना त्यांच्या देय रक्कमा द्याव्यात. 6) महापुरामध्ये गुजराथी कॉलनीमध्ये सफाई कामगारांची  झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी. 7) सर्व कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन ऑक्टोंबर पेड इन नोव्हेंबरचे 5 तारखेपर्यंत देण्यात यावेत. 8) रोनक ठाकूर गोयल यांचे थकीत वेतन मिळणेबाबत अशा मागण्या होत्या. यासाठी दि.5/11/2020 रोजी संघटनेच्या वतीने एक दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले. त्या अनुषंगाने खालील  सर्व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली. 
  • या 8  विविध मागण्यासंदर्भात पक्षनेते गुरूदास अभ्यंकर, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, नगरसेवक संजय निंबाळकर, विक्रम शिरसट, निलेश डोंबे, कृष्णा वाघमारे, बसवेश्वर देवमारे, विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे व संघटनेचे मा.जिल्हाध्यक्ष नागनाथ गदवालकर, सोलापूर शहराध्यक्ष बाली मण्डेपू, पंढरपूर शहराध्यक्ष गुरू दोडीया, सचिव महेश गोयल, काशिनाथ सोलंकी, संतोष साळवे, ऍड.किशोर खिलारे, किशोर दंंडाडे, प्रमोद वाघेला, अनिल गोयल, सतीश सोलंकी, संजय कांबळे, विठ्ठल वाघमारे, शरद धनवजीर, सचिन इंगळे, सुमित वाघमारे, धर्मा पाटोळे यांची मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर वरील मागण्या मान्य करण्यात आल्या. त्याचबरोबर 1, 2 व 4 या मागण्याविषयी  नगराध्यक्षा परगावी असल्याने निर्णय झालेला नाही. परंतू सोमवार पर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात निर्णय घेवू असे आश्वासन पदाधिकारी व मुख्याधिकारी दिले आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये कर्मचाऱ्यांनी आपल्या व कुटूंबाच्या जीवाची पर्वा न करता जोखीम घेवून अहोरात्र शहराची सेवा केलेली आहे.  स्वत:च्या कर्तव्याच्या पुढे जावून सेवा केलेली आहे. तसेच चंद्रभागा नदीला महापूर आल्यानंतर ही सेवा बजावलेली आहे. या कामगारांचा योग्य रितीने सन्मान व्हावा व त्यांची दिवाळी गोड व्हावी. असा निर्णय न झाल्यास कर्मचारी दि.12/11/2020 रोजी संपावर जातील असा इशारा शहराध्यक्ष गुरू दोडीया यांनी दिलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *