ताज्याघडामोडी

मेहुण्याने मेहुणीवर केला जीवघेणा हल्ला; भितीपोटी घरी येत उचलले धक्कादायक पाऊल

धुळे शहरातील कुमार नगर (सिंधी कॅम्प) येथे एका व्यक्तीने आपल्या मेहुणीवर जीवघेणा हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. आज दुपारी सायंकाळच्या सुमारास त्याने हा हल्ला केला. हरेश परसराम आसीजा असे या व्यक्तीचे नाव आहे. तर प्राची बंटी खेमानी अशे त्याच्या मेहुणीचे नाव आहे. हरेशने प्राचीच्या गळ्यावर व तोंडावर धारदार शस्त्राने चार ते पाच वार करून गंभीर जखमी करीत प्राचीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या नंतर हरेशने लागलीच घरी जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हरेशने प्राची हिला गंभीरित्या जखमी का केले हे अद्याप पर्यंत समजू शकले नाही. या घटनेनंतर प्राचीला तात्काळ धुळे शहरातील साक्री रोडवरील सेवा हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. तिच्यावर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती सध्या गंभीर आहे. तर दुसरीकडे प्राची हिच्यावर प्रांगणात हल्ला केल्यानंतर हरेश परसराम आसीजा याने शिव रेसिडेन्सी गणेश कॉलनी येथे आपल्या घरी जाऊन गळ्याला फाशी लावत आपले जीवन संपवले. प्राचीवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून अद्याप पर्यंत तिच्यावर हरेशने हल्ला का केला, यामागील कारण समजू शकले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

घटनेमुळे कुमार नगर भागात व गणेश कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी सिंधी समाजाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते गुलशन उदासी यांनी तत्काळ धुळे शहर पोलिसांना खबर देऊन जखमी प्राची खेमानी हिस सेवा हॉस्पिटल येथे उपचारास दाखल केले. घटनेची माहिती मिळताच धुळे शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांनी लागलीच मेव्हण्याचा शोध सुरू केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *