ताज्याघडामोडी

महर्षी वाल्मिकींच्या जयंतीदिनी कोळी बांधवांचा यल्गार! अर्धनग्न होऊन केला शासनाचा निषेध!!

महर्षी वाल्मिकींच्या जयंतीदिनी कोळी बांधवांचा यल्गार! अर्धनग्न होऊन केला शासनाचा निषेध!!

पंढरपूर (प्रतिनिधी):- आज दि. 31 ऑक्टोबर रोजी आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंतीच्या दिवशी शासकीय लाभापासून वंचीत राहिलेले कोळी महादेव जमात बांधवांनी शासनाविरुध्द यल्गार पुकारला. चंद्रभागेच्या वाळवंटातील महर्षी वाल्मिकी यांच्या मंदिरासमोर अर्धनग्न होऊन आपल्या हातात जमात बांधवांच्या प्रलंबीत मागण्यांसंदर्भातील फलक घेतलेल्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न होऊन शासनाचा निषेध व्यक्त केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आमच्या बर्‍याच वर्षापासुन प्रलंबीत असलेल्या मागण्याचा विचार कररुन आम्हाला न्याय द्यरावा. असे मत यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेेश अंकुशराव यांनी व्यक्त ेकेले. जर ाामच्या मागण्या मान्य झाल्यानाहीत तर आम्ही येत्या काळात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करु! असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.  

भक्त पुंडलिकाच्या व महर्षी वाल्मिकींच्या साक्षीने गेल्या कित्येक पिढ्यांपासुनचा कोळी महादेव जमातीचा आक्रोश आज पंढरीच्या वाळवंटात व्यक्त झाला. नेहमी विठ्ठल नामाने व टाळमृदंगाच्या गजराने निनादणारे चंद्रभागेचे वाळवंट आज कोळी महादेव जमातीच्या युवकांनी शासनाच्या निषेधार्थ केलेल्या घोषणांनी दुमदुमला. न्याय्य हक्कापासुन आमच्या जमात बांधवांना वंचीत ठेवणार्‍या राजकारण्यांचा, सर्व राजकीय पक्षांचा व राजकारण्यांच्या सर्व पिलावळींचा आज महर्षी वाल्मीकी जयंतीदिनी आम्ही तीव्र शब्दात निषेध केला आहे. कोळी महादेव जमातीचे दाखले व वैधता प्रमाणपत्र मिळावे, कोळी महादेव जमातीच्या कर्मचार्‍यांना सेवेतून कमी करु नये, ज्या कोळी जमातीच्या कर्मचार्‍यांना सेवेतून कमी केले अशा कर्मचार्‍यांना पुन्हा रुजु करावे, आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे चंद्रभागेत राष्ट्रीय स्मारक व्हावे ही अनेक वर्षापासुनची मागणी आहे, यास मंजुरी मिळुनही अद्याप कामास सुरुवात झालेली नाही, 1950 च्या आतील पुरावे असुन देखील जातीचे दाखले व वैधता प्रमाणपत्र मिळत नाही ते मिळावे, कांही जणांना जातीचे दाखले मिळाले आहेत परंतु अनेकांना अद्यापही जातीचे दाखले मिळालेले नाहीत, 1995 च्या जीआर ची व्याप्ती 2005 पर्यंत वाढवावी व कमी केलेल्या कर्मचार्‍यांना पुन्हा रुजु करावे..!, नुकत्याच चंद्रभागेला येवुन गेलेल्या महापुराच्या काळात ज्या होडी चालकांनी मदतकार्य केले या होडीचालकांचा शासनदरबारी योग्य सन्मान व्हावा, पुंडलिक सेतू रद्द करावा.’’ या मागण्यांचे फलक हाती घेऊन अर्धनग्न होऊन घोषणा देत महर्षी वाल्मिकी संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपला आक्रोश आज व्यक्त केला आहे. अशी माहिती संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या एका पत्रकाद्वारे दिली आहे.

वारंवार लोकशाही मार्गाने शांततेत आपल्या मागण्या महाराष्ट्र शासनाकडे मागुनही शासनाने आजपर्यंत कोळी महादेव जमातीला न्याय देण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलत नाही. त्यामुळे महर्षी वाल्मिकी जयंती चे औचित्य साधुन समस्त कोळी महादेव जमात बंधु-भगिणींनी इतर खर्चाला फाटा देऊन महर्षि वाल्मिकी जयंती दिवशी आपल्या जमात बांधवांना संघटीत करुन आपापल्या भागातील विविध प्रशासकीय कार्यालयासमोर आपल्या जमात बांधवांनी यल्गार पुकारावा. व विविध कार्यालयांसमोर आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करुन जयंती साजरी करावी. असे आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने आवाहन केले होते. त्यानुसार आज विविध भागात शासनाचा निषेध व वेगवेगळी आंदोलने झाली.

पंढरीच्या वाळवंटातील महर्षी वाल्मिकी मंदिरासमोर कार्यकर्त्यांनी हाती मागण्यांचे फलक घेऊन अर्धनग्न अवस्थेत अनोखे आंदोलन करत शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव, जयवंत अभंगराव, राहुल परचंडे, प्रकाश मगर, सुरज कांबळे, महेश माने, अक्षय म्हेत्रे, सुनील म्हेत्रे, सुरज नेहतराव, दत्ता अधटराव, रामभाऊ सुरवसे, वैभव माने, किरण वाघमारे, सुखदेव वाघमारे, पांडुरंग अंकुशराव, किसन बळवंतराव, राहुल वाघमारे, शिवाजी पाटील, करन वाघमारे, विकी अभंगराव, दादा छत्रे, पृथ्वीराज हरणे, योगीराज वाघमारे, प्रसाद वाघमारे, पप्पु कोळी, कृष्णा अधटराव, खंडोबा करकमकर, सचिन नेहतराव, ज्योतीराम कोळी,  सुरज ननवरे आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *