ताज्याघडामोडी

पंढरपूर ते वाखरी रस्ता राष्ट्रीय महामार्गात घेवून काँक्रीटीकरण करणेबाबत केंद्रीयमंत्री गडकरी यांचेकडे मागणी – आ.प्रशांत परिचारक

पंढरपूर ते वाखरी रस्ता राष्ट्रीय महामार्गात घेवून काँक्रीटीकरण करणेबाबत
केंद्रीयमंत्री गडकरी यांचेकडे मागणी – आ.प्रशांत परिचारक

पंढरपूर ते वाखरी रस्ता राष्ट्रीय महामार्गात घेवून त्याचे काँक्रीटीकरण करणेबाबत राष्ट्रीय परिवहन व राष्ट्रीय
महामार्ग, भारत सरकारचे केंद्रीय मंत्री ना.श्री.नितीन गडकरीसाहेब यांचेकडे लेखी पत्राव्दारे आमदार प्रशांत
परिचारक यांनी मागणी केली आहे.

श्री विठुरायाचे दर्शनासाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे नेहमीच हजारो वारकरी भाविक भेट देत असतात. यासाठीच
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, श्रीसंत तुकाराम महाराज, श्रीसंत एकनाथ महाराज यांच्या पालखी मार्ग म्हणजेच
आळंदी-पंढरपूर, देहु-पंढरपूर, पैठण-पंढरपूर या मार्गाचे तसेच पंढरपूरला जोडणारे सर्वच मार्गाचे महामार्गात
रूपांतर करून चौपदरीकरण करणेसाठी ना. श्री.गडकरीसाहेब यांनी निधी उपलब्ध करून दिला असून सदरचे कामही
प्रगतीपथावर आहे.

पंढरपूर ते आळंदी या राष्ट्रीय महामार्गातील वाखरी ते पंढरपूर अंदाजे अंतर ५ ते ६ किमी हा टप्पा पंढरपूर
नजीक या ठिकाणी बायपास रोड दिल्यामुळे त्यातून वगळला गेला आहे. हा रस्ता मोठ्या प्रमाणात वाहतूकीचा
असून पंढरपूरातील आषाढी एकादशी सोहळ्यासाठी श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज, श्रीसंत तुकाराम महाराज आदींसह
प्रमुख पालख्या या वाखरी येथे आल्यानंतर त्यांचे स्वागतासाठी कर्नाटक, मराठवाडा आदीं ठिकाणाहून येणाऱ्या
इतर सर्वच पालख्या वाखरी येथे येत असतात. त्यावेळी वाखरी येथे रिंगण सोहळा आयोजीत केला जातो. त्यानंतर
दशमीला सायंकाळी या सर्व पालख्यांसह सुमारे १० लाखाहून अधिक वारकरी या रस्त्यावरून एकाचवेळी एकत्रित
मार्गक्रमण करीत असतात. तोच गरजेचा टप्पा या राष्ट्रीय महामार्गाचे आराखड्यातून वगळला गेला असल्याचे
केंद्रीय मंत्री श्री.गडकरी साहेब यांना कळविले आहे. हा रस्ता करताना वाखरी ते पंढरपूर या ठिकाणी सद्यस्थितीत
दुभाजकासह चारपदरी रस्ता आहे. त्यामुळे नवीन जमीन भूसंपादीत करण्याची गरज भासणार नाही.

वाखरी ते पंढरपूर हा अंदाजे ६ किमीचा टप्पा राष्ट्रीय महामार्गात घेवून त्याचे काँक्रीटीकरण केल्यास

झाल्यास पंढरपूरकरांची व वारकरी भाविकांची पुढील अनेक वर्षाची सोय होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *