ताज्याघडामोडी

श्री विठ्ठल कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ

श्री विठ्ठल कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ

पंढरपूर २५ : श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचा ४० वा गळीत हंगाम शुभारंभ आज दिनांक २५.१०.२०२० रोजी
सकाळी १०.१० वाजता या शुभमुहूर्तावर ह.भ.प.भागवत महाराज चवरे यांचे प्रमुख उपस्थितीत, श्री सुभाष वसंतराव भोसले,माजी
नगराध्यक्ष,पंढरपूर यांचे अध्यक्षतेखाली तसेच श्री बाबा उर्फ प्रभाकर बाबुराव अधटराव माजी नगराध्यक्ष पंढरपूर, श्री दिलीप
काशिनाथ धोत्रे प्रदेश सरचिटणीस म.न.से.श्री संजय शिवलाल कोकाटे शिवसेना नेते माढा विधानसभा आदी मान्यवरांच्या शुभहस्ते
व कारखान्याचे जेष्ठ सभासद श्री चांगदेव दत्तात्रय कदम, श्री नंदकुमार बाळकृष्ण पाटील, कालीदास रघुनाथ पाटील, मारुती रामा
पवार, माधव नारायण चव्हाण, नागन्नाथ तायाप्पा मोरे,नांगन्नांथ माहती गायकवाड, तानाजी नयाजी सावंत, शिवाजी औदुंबर
हुंगे-पाटील, उत्तम भागवत घाडगे,भिमराव सदाशिव पवार,बाबासाहेन सदाशिव हाके, दशरथ रघुनाथ पाटीलल,लक्ष्मण वासन
पारेकर, राजू देवराव दगडे,दगडू दिगंबर भुसनर,राणबा केरबा शिंदे,आप्पा नारायण पवार,बलभीम आप्पा घाडगे,बाळासाहेब
वसुदेव लामकाने,शंभुदेव चंद्रसेन बाबर तसेच काखान्याचे चेअरमन, आमदार श्री भारत तुकाराम भालके व व्हाईस चेअरमन श्री
लक्ष्मण नामदेव पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.कलश पुजन कारखान्याचे संचालक श्री दशरथ पंढरीनाथ खळगे यांच्या
शुभहस्ते करण्यात आले.

स्वागत व प्रास्ताविक भाषणात बोलतांना कारखान्याचे चेअरमन,आमदार श्री भारतनांना भालके म्हणाले की, गेल्या
तिझनला कारखाना चालू झाला नाही, याची मोठी खंत मनामध्ये असून यावर्षी कारखाना पुर्ण क्षमतेने चालणार असून त्यासाठी
लागणारी तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज असून गळीतासाठी २५ हजार एकर ऊसाची नोंद झालेली असून त्यापासून अंदाजे १३ लाख
मे.टनाचे गाळपाचे उद्दीष्ट आहे. दोन ते तीन दिवसात तोडणी वाहतूकीचे कमिशन व डिपॉझीटचे बीले देणार असल्याचे त्यांनी
सांगीतले, तसेच कर्मचाऱ्यांनाही दिपावली सणापुर्वी पगार देणार असल्याचे त्यांनी सांगीतले. कारखान्याकडील सर्व कर्जाची वेळेत
परतफेड करु, यावषी ऊसपिक चांगले असताना अतिवृष्टीमुळे भीमा नदीला पुर आल्याने ऊसाचे फार मोठे नुकसान झालेले
असल्याने त्यांचे ऊसाचे वेळेत गाळप करुन त्यांना मदत करुन जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊसदर देणार असल्याचे
त्यानी सांगीतले. सर्व सभासद शेतकऱ्यांनी आपण पिकविलेला संपूर्ण ऊस कारखान्यास गळीतास देऊन गळीत हंगाम यशस्वी पार
पाडण्यासाठी सहकार्य करावे, कोरोनाच्या काळात सर्वांनी आपले आरोग्य संभाळून आपली काळजी ध्यावी, असे आवाहनही
आमदार ‘भारतनाना भालके यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात बोलताना श्री सुभाष वसंतराव भोसले म्हणाले की, कै, औदुंबरआण्णाच्या पाऊलावर पाऊल ठेवूनच
त्याच काटकसरीने आमदार भारतनाना भालके हे काम करीत आलेले आहेत. आमदार भारतनानांच्या काळात कारखान्याचं ७५००
मे.टन विस्तारीकरण झालं, ३० हजार के.एल.पी.डिस्टलीरी उभा केली, ३० मे.वॅट क्षमतेचे सहवीज निर्मिती प्रकल्प उभा राहीला,
सभासदांच्या २२ कोटी रुपयाच्या ठेवी परत केल्या. गेला सिझनला कारखान्याचे नेटवर्थ अधिक असताना भाजपा सरकारच्या
चुकीच्या धोरणामुळे आपल्या कारखान्यास पुर्वहंगामी कर्ज मिळू शकले नाही त्यामुळे कारखाना चालू झाला नाही, याची खंत
आमदार भारतनाना यांना असून यापुढे कारखान्यास आ.भारतनानांच्या नेतृत्वाखाली चांगले दिवस येणार असून आपला पिकविलेला
संपूर्ण ऊस आपल्या कारखान्यास गाळपास देऊन सहकार्य करावे, असे त्यांनी सांगीतले.

सदर प्रसंगी बोलताना ह.भ.प. भागवत महाराज चवरे हे आपल्या अध्यात्मीक शैलीमध्ये विचार व्यक्‍त करताना म्हणाले
की, श्री विठ्ठल कारखान्यामागे फार मोठी ञाध्यात्मीक शक्‍ती असून, श्री विठ्ठल कारखान्याची निर्मिती कै.औदुंनरआण्णा पाटील
यांचे प्रेरणेतून झालेली असून श्री विठ्ठल कारखान्याला अनेक साधू संताचे आशिर्वाद लाभले आहेत. श्री विठ्ठल कारखाना हे पंढरपूर
तालुक्‍याचे अर्थक्रांतीचे स्थान आहे. तालुक्‍याचे गतीमान नेतृत्व आमदार भारतनाना भालके हे जनतेचे प्रश्‍न सोडविणेसाठी संतत
प्रयत्नशिल असून श्री विठ्ठल कारखान्याने त्यांचे नेतृत्वाखाली उतुंग ज्ञेप घेतलेली आहे एक अभ्यासू व प्रभावशाली लोकप्रतिनिधी
म्हणून त्याचा दबदबा आहे, असे सांगीतले व गळीत हंगाम यशस्वी होणेसाठी शुभेच्छा दिल्या.

सदर प्रसंगी बोलताना श्री संजय कोकाटे म्हणाले की, आमदार भारतनाना भालके यांच्यामुळे महाराष्ट्रातील ४० साखर
कारखान्यांना कर्ज मिळाले. त्यांच्या नेतृत्वाखाली श्री विठ्ठल कारखान्याची फार मोठी प्रगती झाली असून यावर्षी जिल्ह्यातील सर्व
कारखान्याबरोबर ऊसदर देऊ असे आ.भारतनांनांनी आश्‍वासन दिले असून कारखान्यास सहकार्थ करु असे त्यांनी शेवटी सांगीतले.

सदर प्रसंगी बोलताना पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष श्री बाबा अधटराव म्हणाले की, श्री विठ्ठल कारखाना हा
पंढरपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा आधारवड असून तो शेतकऱ्यांचा राजवाडा आहे. आजपर्यंत आमदार भारतनाना यांनी
कारखान्याच्या माध्यमातून सर्व सभासद व जनतेचे हित जोपासले आहे असे त्यांनी सांगीतले.

सदर प्रसंगी बोलताना म.न.से. चे प्रदेश सरचिटणीस श्री दिलीप धोत्रे म्हणाले की, कारखाना वेळेत सुरु न्हावा यासाठी
आमदार भारतनाना भालके यांनी कारोना सारख्या महामारीच्या काळातसुध्दा कारखान्यास पुर्वहंगामी कर्ज वेळेत मिळावे म्हणून
संतत मुंबईला जावून पाठपुरावा करुन सभासद शेतकऱ्यांचे व कामगारांचे देणी देवून सर्व सभासद व जनतेचे हित जोपासले आहे
असे त्यांनी सांगीतले.

सदर प्रसंगी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे अध्यक्षपदी निवड झालेबद्दल अँड.गणेश पांडुरंग पाटील यांचा
सत्कार आमदार भारतनाना भालके याचे शुभहस्ते करण्यात आला,

कारखान्याच्या सर्व सभासदांचा दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि.,सोलापूर यांचेकडून सभासद अपघात विमा योजनेंतर्गत
‘विमा उतरविलेला असून दुर्दैवाने मयत झालेले कै.ज्ञानदेव रामचंद्र माळी,रा.उंबरे यांचे वारस पांडुरंग ज्ञानदेव माळी ,रा.उंबरे यांना
रु.५.०० लाख व कै, मोहन रंगनाथ सलगर,रा.उंबरे यांचे वारस पत्नी श्रीमती साधना मोहन सलगर, रा.उंबरे यांना रू.५,०० लाख
व कै.गणेश बाबु रोकडे, रा.शेळवे यांचे वारस पत्नी श्रीमती रेश्मा गणेश रोकडे,रा,शेळवे यांना रू.५.०० लाख असे एकूण
रु.१५.०० लाख सभासद अपघात विमा चेकचे वाटप कारखान्याचे चेअरमन आमदार मा.श्री भारत भालके,यांचे हस्ते देणेत आले,

सदर कार्यक्रमा प्रसंगी कारखान्याचे जेष्ठ संचालक कै.पांडरंग उर्फ राजूबापू पाटील व कै. बाळू लोंढे व इतर सभासद,
कर्मचारी व हितर्चितक मयत झालेत आहेत त्यांना श्रध्दांजली अपर्ण करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक सर्वश्री श्री मोहनआण्णा कोळेकर, अँंड,दिनकरबापू पाटील, युवराज
पाटील, विजवसिंह देशमुख,सुर्यकांत बागल, गोकुळ जाधव, नेताजी सावंत, संतोषकुमार गायकवाड, उत्तम नाईकनवरे, नारायण
जाधव, बाळासाहेब गडदे, राजाराम भिंगारे,महादेव देठे,शांतीनाथ बागल, धनाजी घाडगे, माजी संचालक माणिक बाबर,
जयसिंह देशमुख,तानाजी चव्हाण,मेजर विलास भोसले, द्रोणाचार्य हाके, राजाराम बाबर,दिपक सदाबसे, धोंडीवा वाघमारे,
कांतीलाल भिंगारे, अँड.कोष्टी आर.टी., बी.पी.पाटील,दामाजी कारखान्याचे व्हाईस चेअरमन रामचंद्र वाकडे,लतीफ तांबोळी,
सुरेश कट्रे,संदिप मांडवे,राहुल सांवजी, मुज्ञमिल काझी, तुकाराम मस्के, शशिकांत शिरगिरे, संजय नंदपट्टे, शशांक गौरी, अतुल
खरात,सुधीर भोतले, राजाभाऊ शहापुरकर,बाळासाहेब शेख, कारखान्याचे सचिव श्री बी.सी,कर्षे, कारखान्याचे आजी माजी सर्व
संचालक,अधिकारी व कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद, व्यापारी व हितरचितक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कारखान्याचे संचालक श्री दशरथ पंढरीनाथ खळगे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *