ताज्याघडामोडी

उपजिल्हा रुंग्णालय पंढरपुरला राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार जाहीर

उपजिल्हा रुंग्णालय पंढरपुरला राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार जाहीर

 सन २०१९-२०२० चा शासनाचा राज्यस्तरीय कायाकल्प
पुरस्कार (उत्तेजनार्थ) उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर या संस्थेस जाहीर झाला असुन
उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय संवर्गामध्ये ९६.५० टक्के गुण मिळवुन
उपजिल्हा रुग्णालय पंढरपुरने जिल्हयात पहिला तर राज्यात १२ वा कमांक
मिळविला असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक डॉ.जयश्री ढवळे
यांनी सांगितले.

अहमदनगर जिल्हयातील श्रीरामपुर ग्रामीण रुग्णालयाने १०० टक्के गुण
मिळवुन प्रथम क्रमांक पटकाविला तर कोल्हापुर जिल्हयातील कसबाबावडा सेवा
रुग्णालयानी ९९.८० टक्के गुण मिळवुन व्दितीय क्रमांक मिळविला. तर उपजिल्हा
रुग्णालयाने ९६.५० टक्के गुण मिळवुन उत्तेजनार्थ पुरस्कार मिळविला. सदर
पुरस्काराचे स्वरुप रुपये एक लाख व प्रशिस्तीपत्रक असे असुन तो अंतर्गत व बाहेरील
परीसर स्वच्छता आणि इतर अनेक निकषाच्या आधारे दिला जातो.

११ मार्च २०२० रोजी राज्यस्तरीय पथकाने उपजिल्हा रुग्णालय
पंढरपुरचे कायाकल्प पुरस्कारासाठी मुल्यांकन केल्याची माहिती या काळातील प्रभारी

वैद्यकिय अधिक्षक डॉ.प्रदीप केचे यांनी दिली.

सदर पुरस्कारासाठी रुग्णालयातील अंतर्गत व बाहयपरीसरातील स्वच्छता
,इन्फेक्शन कंट्रोल, आदी विविध मुद्दयांचे त्रिस्तरीय परीक्षण प्रक्रियेव्दारे परीक्षण
करुन ज्यामध्ये कमीत कमी ७० टक्के गुण मिळाल्यास अशा संस्थेचे राज्यस्तरीय
परीक्षणासाठी निवड केली जाते. या तपासणीमध्ये संस्थेची
इमारत,वाहनतळ,रंगरंगोटी,दिशा दर्शक फलक ,नकाशे तसेच रुग्णांसाठी माहितीपत्रक
व भित्तीचित्र ,फलक असणे तसेच रुग्णांच्या वॉर्ड मध्ये पुरेसा प्रकाश असणे तसेच
जैववैद्यकिय कचरा व्यवस्थापन ,रुग्णांसाठी पुरेसे पिण्याचे शुध्द पाणी अशा प्रकारचे

अनेक निकष तपासले जातात अशी माहिती कायाकल्प नोडल ऑफीसर डॉ.आशा
घोडके यांनी दिली.

सदर परिक्षणासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेळे ,निवासी
वैद्यकिय अधिकारी डॉ.मोहन शेगर यांनी मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी करता उपजिल्हा रुग्णालयाचे सर्व वैद्यकिय
अधिकारी ,परिसेविका श्रीम .रेखा ओंभासे , श्रीम.ठकार ,अधिपरिचारीका श्रीम .रेवती
नाडगोडा सर्व वैेपरिचारीका र वर्ग कर्मचारी य यांनी थक
नाडगोडा ,सर्व अधि ,वर्ग -४ कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *