ताज्याघडामोडी

कलासाधनाच्या वतीने विविध मान्यवरांचे सत्कार समारंभ संपन्न!

पंढरपूर -पंढरीतील नामवंत क्लासेस ज्ञानप्रसाद अँकेडमी व ब्रिलीयंट अँकेडमीचे सर्वेसर्वा प्रा. विनायक
परिचाकर सर यांची देशपातळीवरील सी.टी.एफ या शिखर संघटनेमध्ये तज्ञ व अनुभवी व यशस्वी
व्यक्तिमत्त्व म्हणून निवड झाली . तसेच श्रीराम बडवे यांची पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण व माहिती
अधिकार पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच कु. संजीवनी ज्ञानेश मोरे, कु. गौरी
अमरसिंह चव्हाण, कु.वैष्णवी गाडे, कु. अदिती महेश अंबिके, चि. चैतन्य मकरंद बडवे या विद्यार्थ्यांनी
बारावी परिक्षेत भरघोष यश प्राप्त केल्या बद्दल पंढरीतील ज्येष्ठ शस्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण बडवे यांच्या
शुभहस्ते व सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांचे अध्यक्षतेखाली व
मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत महाजन बडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी डॉ. करांडे यांनी मुलांनी मिळालेल्या गुणांमुळे हुरळून न जाता असेच सातत्य पुढे
सुरु ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तर शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण बडवे म्हणाले की, परिचारक सर हे
अत्यंत हाडाचे शिक्षक असून त्यांनी आत्तापर्यंत शिक्षणक्षेत्रात दिलेल्या योगदानाचे हे आजचे यश आहे.
दोन वर्षापूर्वी विनायक परिचारक यांना राज्यपातळीवरचा विशेष पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी
मंडळाच्या वतीने त्याना विशेष गुणवत्ताप पुरस्काराने गौरविण्यात आले होते त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष
श्रीकांत महाजन बडवे यांनी सरांना आता राज्यपातळीवरील पुरस्कार मिळाला आहे आता यावर न
थांबता त्यांना देशपातळीवर कार्य करण्याची संधी मिळावी ही अपेक्षा व्यक्त केली होती. त्याचे फळ
आज आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ज्ञानेश मोरे यांनी केले तर आभार सौ.
सारीका कोठाडीया यांनी मानले.

 यशस्वी होण्यासाठी प्रा. वा. गो. भाळवणकर, प्रशांतमहाजन, अक्षय बडवे, रणजीत पवार, राजेंद्र माळी साहेब, मोहीत शहा, शशिकांत माळी यांनी विशेष प्रयत्न केले.मा. प्रा. बिनायक परिचराकर सर, रामभाऊ बडबे ब गुणवंत विद्यार्थी कु. संजीबनी मोरे, कु. गौरी चव्हाण, कु. आदिती अंबिके, कु. गाडे, चैतन्य बडबे यांच्या सत्कार प्रसंगी
कलासाधनाचे अध्यक्ष श्रीकांत महाजन बडवे, डॉ. कैलाश करांडेसर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण बडवे.

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *