ताज्याघडामोडी

फेब्रुवारी-२०२० मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूरचे यश

फेब्रुवारी-२०२० मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूरचे यश

 

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी –२०२० मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये “कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर” या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे यश संपादन करुन प्रशालेचे नाव उज्ज्वल केले आहे.
इयत्ता ५ वी साठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रशालेचे एकूण १० विद्यार्थी पात्र झाले आहेत. त्यापैकी अश्लेशा भोसले हीने ६१.५३% गुण मिळवून प्रशालेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला तर रितेश पाटील याने ५६.६४% गुण मिळवत प्रशालेमध्ये व्दितीय तसेच ओजस बोंदर याने ५४.५४% गुण मिळवत प्रशालेमध्ये तृतीय क्रमांक व अमृता चौगुले हीने ५१.७४% गुण मिळवत प्रशालेमध्ये चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. इयत्ता ५ मध्ये अथर्व मस्के(५०.३४%), कृष्णाली थोरात(५१.०४%), राजनंदिनी पवार(४२.६५%), शिवराज गोडसे(४७.५५%), सिमरन मुजावर(४७.५५%), वेदांतीका गोरे(४६.८५%) हे विद्यार्थी प्रशालेमध्ये पात्र ठरले.
इयत्ता ८ वी साठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रशालेचे एकून ४ विद्यार्थी पात्र ठरले असून त्यापैकी समर्थ वेल्हाळ याने ५५.७८% गुण मिळवत प्रशालेमध्ये प्रथम क्रमांक, परिक्षित सावंत याने ५५.१०% गुण मिळवत प्रशालेमध्ये व्दितीय तर ज्ञानेश्वर चौगुले याने ५३.७४% गुण मिळवत प्रशालेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला.
इयत्ता ८ वी मध्ये अंजली दिंडोरे हिने ४९.६५% गुण मिळवून प्रशालेमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरली. या यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार प्रशालेच्या प्राचार्या सौ शैला परेश कर्णेकर तसेच रजिस्ट्रार श्री गणेश वाळके यांचे हस्ते करुन गौरविण्यात आले व या यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांनी पुढील वाट्चालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.संध्या उकरंडे टीचर यांनी केले. यावेळी प्रशालेचे शिक्षक श्रीमती कोकणे टीचर, सौ प्रज्ञा टीचर, सौ शारदा परदेशी, सौ प्रियांका टीचर, श्री राहुल काळे,श्री नारायण कुलकर्णी, श्री मंगेश केकडे , श्री सावंत सर यांचे हस्ते पुष्पगुच्छ देवून विद्यार्थ्यांचा मानसन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *