ताज्याघडामोडी

*जनकल्याण हॉस्पिटलच्या वतीने सहकार शिरोमणी कारखान्यातील कर्मचाऱ्यांना* मास्क व अर्सेनिक अल्बम गोळयांचे वाटप

जनकल्याण हॉस्पिटलच्या वतीने सहकार शिरोमणी कारखान्यातील कर्मचाऱ्यांना
मास्क व अर्सेनिक अल्बम गोळयांचे वाटप.

पंढरपुर ता.प्रतिनिधी.(दि.14) कोरानाची भिती न बाळगता वेळीच योग्य काळजी घेवून, उपचार केल्यास कोरानाचा रुग्ण बरा होवू शकतो. हॅण्ड सॕनिटायझर,मास्कचा वापर आणि सामाजिक अंतर ठेवल्यास कोरोनाचा प्रार्दुभाव होणार नाही. त्याच बरोबर शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन *वसंतदादा मेडीकल फाउंडेशन संचलित*  जनकल्याण हॉस्पिटलचे *संस्थापक डॉ.सुधीर शिनगारे यांनी केले.*

*कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे मार्गदर्शनाखाली* आणि पंढरपूर येथिल *जनकल्याण हॉस्पिटलच्या वतीने* भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या आधिकारी, कर्मचारी व कामगारांना मास्क व आर्सेनिक आल्बम गोळयांचे वाटप करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. 

*डॉ.सुधीर शिनगारे पुढे म्हणाले की, जगामध्ये सध्या कोराना विषाणु या महामारीमुळे असंख्य लोकांनी प्राण गमावलेले आहेत. आपल्या देशातही या महामारीने थौमान घातले आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्गाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून,प्रत्येकांनी स्वत:ची व आपल्या कुटुंबियांची काळजी घेणे गरजेचे आहे. ,वेळीच योग्य काळजी घेवून,उपचार केल्यावर रुग्ण बरे होतात. सर्वांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे,विनाकारण घराबाहेर पडू नये शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे असे आवाहन करुन डॉ.शिनगारे यांनी कोरोना विषाणुवर मात करण्यासाठी सर्वांनी घ्यावयाची काळजी व उपाययोजनासंबधी मार्गदर्शन केले*

यावेळी कारखान्याचे डेप्यु.जनरल मॕनेजर के.आर.कदम, वक्र्स मॕनेजर जी.डी.घाडगे,प्रॉडक्शन मॕनेजर एन.एम.कुंभार,शेती आधिकारी पी.जी.शिंदे,सिव्हील इंजिनिअर एन.एम.काळे,डेप्यु.चिफ अकौंटट नवनाथ कौलगे,बबन सोनवले,केनयार्ड सुपरवायझर डी.डी.काळे,सुरक्षा आधिकारी बी.एस.पिसे,कर्मचारी व कामगार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक बंडू पवार यांनी केले तर आभार संतोष काळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *