ताज्याघडामोडी

पांडुरंग कारखान्याचा 29 वा गळीत हंगाम सुरु कामगारांना 15 टक्के बोनस, भविष्यात दहा हजार टन  गाळप क्षमता करणार – प्रशांतराव परिचारक

पांडुरंग कारखान्याचा 29 वा गळीत हंगाम सुरु

कामगारांना 15 टक्के बोनस, भविष्यात दहा हजार टन  गाळप क्षमता करणार –
प्रशांतराव परिचारक

श्रीपुर (ता.माळशिरस) येथील देशपातळीवर आणि राज्य पातळीवर नाव लौकिक
करणारा श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा
एकोणतिसाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ नूतन चेअरमन प्रशांत परिचारक,
पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक कर्मयोगी कै.सुधाकरपंत
परिचारक यांचे जुने सहकारी,मित्र व कारखान्याचे ज्येष्ठ सभासद ह-भ-प
बाळशास्त्री हरिदास, बाळासाहेब बडवे, घन:श्याम काटकर, नानासाहेब गाजरे,
मारुती देशमुख, मल्हारी वाघमारे, लक्ष्मीनारायण भट्टड, सिताराम नागणे,
भीमाशंकर भिंगे, आनंदराव क्षिरसागर, वसंत पाटील, बळवंत व्हळगळ, परमेश्वर
मस्के, हरी खंडेकर, वसंतराव बंडगर, माजी चेअरमन दिनकरभाऊ मोरे, चेअरमन
प्रशांत परिचारक, व्हाईस चेअरमन वसंतराव देशमुख, कार्यकारी संचालक डॉ.
यशवंत कुलकर्णी यांच्या शुभहस्ते गव्हाणी मध्ये  ऊसाची मोळी टाकून व
सत्यनारायणाची महापूजा करून करण्यात आला. यावेळी ज्येष्ठांचे फेटे बांधून
सत्कार करण्यात आले व  कै.सुधाकरपंत परिचारक  यांची प्रतिमा भेट देण्यात
आली.

यावेळी  कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी  सांगितले  आपण एफ आर
पी ची सर्व रक्कम दिली आहे आपल्याला शासनाचा गाळप परवाना देखील मिळालेला
आहे. आपले केंद्र सरकारकडे मागील हंगामात निर्यात केलेल्या साखरेचे
अनुदानाचे 28 कोटी रुपये थकीत आहेत. शासनाने एफ आर पी ची रक्कम 100
रुपयाने वाढवली आहे. याचा परिणाम पुढच्या गळीत हंगामामध्ये आर्थिक बाबीवर
होणार आहे. कारखाना पूर्णक्षमतेने गाळप करणार आहे. अकरा लाख मेट्रिक टन
पेक्षाही जास्त यावर्षी गाळप होणार आहे. गाळप कपॅसिटी वाढवण्याचा आणि
इथेनॉल क्षमता वाढवण्याचा देखील प्रस्ताव दिलेला आहे. पाऊसकाळ चांगला
असल्याने ऊस भरघोस प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु सद्यस्थितीला साखर उतारा
साडे नऊ टक्केचा आहे. असे प्रस्ताविका मधून सांगितले.

कै.सुधाकरपंत परिचारक यांचे जुने ज्येष्ठ सहकारी व मित्र ह-भ-प
बाळशास्त्री हरिदास व बाळासाहेब बडवे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना
त्यांना अश्रू  अनावर झाले.

यावेळी चेअरमन प्रशांत परिचारक यांनी कामगारांना दिवाळीसाठीचा बोनस 15
टक्के जाहीर केला. तसेच भविष्यामध्ये हा कारखाना दहा हजार टन गाळप
क्षमतेचा करणार असून, इथेनॉल निर्मिती भर देऊन इथेनॉलची क्षमता वाढवणार
आहोत. असे आपल्या अध्यक्षीय भाषणां मधून जाहीर केले. मोदी सरकारच्या
काळात सर्वात चांगले निर्णय साखर उद्योगाबद्दल झाले. मागील सरकारने वीस
वर्षापासून आम्ही मागणी करून साखरेचे दर वाढले नव्हते ते मोदी सरकारच्या
काळात ३१०० रुपये  झाले. इथेनॉलचे दर वाढवले.  व्यापाऱ्यांनी सुद्धा
एकतीसशे रुपयांच्या खाली साखर घ्यायचे नाही असा निर्णय या सरकारच्या
काळात झाला. असे आपल्या भाषणांमधून सांगितले.

यावेळी व्हा.चेअरमन वसंतनाना देशमुख, दाजी पाटील, दिनकरभाऊ मोरे,
दिलीपराव चव्हाण, दिनकर नाईकनवरे, बाळासाहेब यलमार, हरिषदादा गायकवाड,
तानाजी वाघमोडे, नागन्नाथ शिंदे, दिनकर कवडे, सुरेश आगावणे, ज्ञानदेव
ढोबळे, शिवाजी साळुंखे, महीबुब शेख, नामदेव झांबरे, आनंदराव आरकिले,
परमेश्वर गणगे, संगिता पोरे, पार्वती नरसाळे, सिंधूताई पवार, अरुण घोलप,
भिमराव फाटे, अरुण घोलप, प्रणव परिचारक,राहुल रेडे, मौला पठाण,  संदीप
घाडगे, अजित पोखरे, भिमराव रेडे, सर्व सभासद शेतकरी, परिसरातील ग्रामस्थ,
कारखान्याचे अधिकारी वर्क्स मॅनेजर आर.बी.पाटील, चीफ केमिस्ट एम आर
कुलकर्णी, केन मॅनेजर एस सी कुमठेकर, चीफ अकाऊंटंट आर. एम.काकडे, मटेरियल
मॅनेजर एम.जे.देशपांडे, डेप्युटी चीफ इंजिनियर एम. डी बारटक्के, को जन
मॅनेजर एस एस विभुते, डीस्टी. इन्चार्ज एस. ई. शेख, डे.चीफ केमिस्ट एम.
एल उपासे, ऊस विकास अधिकारी एस. पी.भालेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी
डॉ.सुधीर पोफळे, कॉम्प्युटर इन्चार्ज तानाजी भोसले, सिव्हिल इंजिनिअर एच.
एस.नागणे, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर एस. वाय.सय्यद, हेड टाईम किपर एस.एन.कदम,
सिक्युरिटी ऑफिसर एम एस घाटुळे, जनसंपर्क व स्थावर ऑफिसर आर. डी. गाजरे,
सर्व संचालक, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक डॉ.सुधीर
पोफळे यांनी केले. यावेळी  सकाळपासून दिवसभर पावसाची संततधार सुरू होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *