ताज्याघडामोडी

हैदराबाद आणि बालाजी संस्थान येथून कर्ज मिळवून देतो म्हणून फसवणूक

पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल

आरोपी अमोल बाळकृष्ण कौलगे रा. पिराची किरोली ता. पंढरपूर यास अटक 

गरजूंना बालाजी संस्थान आणी हैदराबाद येथून कर्ज मिळवून देतो असे सांगुन फसवणूक केल्याबाबत ज्ञानेश्वर दत्तात्रय रासकर रा. नानगाव ता. दौंड, जि. पुणे यांची 23 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली म्हणुन पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण येथे तक्रार दाखल केली होती, त्या अनुषंगाने चौकशी आंती अमोल बाळकृष्ण कौलगे रा. पिराची कुरोली ता. पंढरपूर यांच्याविरुद्ध पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण येथे गु. र. न. 263/2022 भा. द. वी. क. 419, 420 अन्वये फसवणूक केल्या बाबत गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हा नोंद केल्याची आरोपीला भनक लागताच आरोपीने अटकपूर्व जामीनसाठी मा. सत्र न्यायालय पंढरपूर येथे अर्ज केला होता परंतु मा. न्यायालयाने सदर आरोपीचा जामीन फेटाळला होता. 

त्यानंतर आरोपी जामीनसाठी पुन्हा मा. उच्च न्यायालय मुंबई येथे अर्ज केला परंतु गुन्ह्यातील गांभीर्य, केलेली फसवणूक न्यायालयाने विचारात घेऊन आरोपीचा जामीन फेटाळला होता. त्या नंतर काल दि. 26/12/2022 रोजी आरोपी अमोल बाळकृष्ण कौलगे रा. हा पिराची कूरोली परिसरात आल्या बाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेवुन सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे. 

आरोपीस मा. न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तपासकामी 31/12/2022 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे. गुन्ह्याच्या तपास पोलीस उप निरीक्षक दिलीप शिंदे करीत आहेत.

नागरिकांना याद्वारे कळविण्यात येते की, अमोल बाळकृष्ण कौलगे रा. पिराची कुरोली ता. पंढरपूर याने आणखी कोणाची फसवणूक केली असेल तर नागरिकांनी धनंजय अ. जाधव, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण (लिंक रोड) येथे संपर्क साधावा असे पोलिसांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *