ताज्याघडामोडी

महाविद्यालय कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन सुरू

महाविद्यालय कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन सुरू

 

पंढरपूर- अकृषी विद्यापीठे व त्या अंतर्गत येणार्‍या अशासकीय महाविद्यालयातील शिक्षकेतर सेवकांना लागू असलेला आश्वासित प्रगती योजनेचा 12  व 24 वर्ष पदोन्नतीचा लाभ, शासन निर्णय दिनांक 7-12-2018 ने पूर्वलक्षी प्रभावाने रद्द केला आहे परिणामी शासनाने दिनांक 7 सप्टेंबर 2019 ने अशासकीय महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेऊन देखील अद्याप 75 टक्के शिक्षकेतर कर्मचारी सातव्या वेतन आयोगापासून वंचित आहेत व सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी  मागील पावणेदोन वर्षांपासून पेन्शन पासून वंचित राहिले आहेत. याबाबत शिक्षकेतर कर्मचारी महासंघाने वेळोवेळी पत्रव्यवहार करून मंत्रिमहोदयांना समक्ष निवेदने देऊनही आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला आदेश पुनर्जिवित केला नाही. या प्रमुख मागणी संदर्भात शासनाचे लक्ष वेधून मागणी मंजूर करण्यासाठी विद्यापीठ व महाविद्यालय कर्मचारी महासंघाने दिनांक 24 सप्टेंबर 2020  पासून पुकारलेल्या लेखणी बंद आंदोलनात कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथील 100 टक्के कर्मचारी सहभागी झाल्याची माहिती श्री अभिजीत जाधव, महासंघ सदस्य यांनी दिली सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

सदरच्या चालू असलेल्या आंदोलनाला पुणे विभागीय शिक्षक आमदार माननीय दत्तात्रय सावंत सावंत सर यांनी भेट देऊन याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून  मागणी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *