ताज्याघडामोडी

शिवसेना आणि शिंदे गटात पुन्हा राडा, आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप, गुन्हा दाखल

गणपती विसर्जनापासून सुरू झालेला एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील राडा काही संपताना दिसत नाही. गणेश विसर्जनाच्या वेळी ही एकनाथ शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर आणि शिवसेनेमध्ये प्रभादेवी येथे राडा झाला होता. दोन्हीही गट एकमेकांसमोर येऊन धिडले होते. मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की आणि शाब्दिक चकमक झाली होती. मात्र काल रात्री पुन्हा एकदा या दोन्ही गटांमध्ये झडप झाली असून, यावेळी आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

दोन्ही गटाचे काही कार्यकर्ते यांच्यात हाणामारी देखील झाली असल्याचं यावेळी समजत आहे. धक्काबुक्की करतेवेळी आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला. या गोळीबारामध्ये शिवसेनेचे महेश सावंत बचावले असल्याचा आरोप शिवसेना आमदार सुनील शिंदे यांच्या कडून करण्यात आले आहेत. मात्र आपण गोळीबार केलेला नाही, शिवसेनेकडून खोटे आरोप लावण्यात येत आहेत असं म्हणत शिवसेनेचे सर्व आरोप आमदार सदा सरवणकर यांनी फेटाळून लावले आहेत.

गणेश विसर्जनाच्या दिवशी या दोन्ही गटांमध्ये वादावादी झाली. मात्र काल रात्री दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले तर शिवसेनेकडून आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. झालेल्या वादा नंतर पोलिसांनी दोन्ही गटांच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

या प्रकरणात पोलिसांकडून सकाळी गुन्हा नोंद करण्यात आला असून, विभाग प्रमुख महेश सावंत यांच्यासह ५ जणांना पोलिसांनी अटक केली असून, फिर्यादीत आणखी १२-१३ जणांची नावे आहेत. तसेच अज्ञात २० ते २२ जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणात एकनाथ शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर किंवा इतर कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *