ताज्याघडामोडी

युवकांचे प्रेरणास्थान,कर्तृत्ववान युवा उद्योजक अभिजीत पाटील

युवकांचे प्रेरणास्थान,कर्तृत्ववान युवा उद्योजक अभिजीत पाटील

स्वराज्यावर चाल करुन जेव्हा अफझल खान आला होता तेव्हा त्याने स्वराज्यातील बहुजनांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरीतील विठ्ठल मंदीराव आघात करण्याचा डाव रचला होता पण पण पांडुरंगाचे निस्सिम भक्त असलेल्या भीमेच्या तीरावरील देवगाव म्हणजेच देगाव येथील भक्तांनी या संकटावर मात केली आणि याची देवगाव म्हणजेच देगावची इतिहासात नोंद झाली. त्याच देगावच्या पवित्र आणि पांडुरंगाच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या या देगावातील ख्यातीप्राप्त विधीज्ञ स्व.धनंजय पाटील यांचे सुपुत्र धडाडीच्या कार्यकतृत्वाच्या बळावर पंढरपूरातील एक प्रगत शेतकरी ते राज्यातील नामवंत व यशस्वी उद्योजक अशी झेप घेतलेले धाराशीव साखर कारखान्याच्या उस्मानाबाद,नांदेड,नाशिक युनिटचे चेअरमन तथा डिव्हीपी नागरी सहकारी पतसंस्था उस्मानाबाद,समृध्दी ट्रॅक्टर्स पंढरपूर,हॉटेल विठ्ठल कामत पंढरपूर,डि.व्ही.पी.मार्ट पंढरपूर,डि.व्ही.पी.स्क्वेअर पंढरपूरच्या माध्यमातून आपल्या बहुआयामी कर्तृत्वाचा परिचय पंढरपूर शहर तालुक्याल्याचा काय तर राज्यातील काळ्या मातीची सेवा करणार्या प्रत्येक कुुटुंबातून पुढे आलेल्या तरुणांना करुन देत आपला वेगळा ठसा उमटवलेले चेअरमन अभिजीत तथा आबा पाटील यांचा आज वाढदिवस.
अभिजीत पाटील यांची लोकप्रियता जाणून घ्यायची असेल तर तरुणांच्या मनाचा कानोसा घ्यावा असे मला वाटते.आणि त्याला कारणेही तशीच आहेत. डीव्हीपी उद्योगसमूह आणि याचे सर्वेसर्वा अभिजित पाटील व अमर पाटील हे बंधू अल्पावधीत आपल्या केवळ कर्तृत्वाच्या बळावर युवकांचे प्रेरणास्थान बनले आहेत.
गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत डीव्हीपी उद्योग समूहाने मोठी विश्वासाहर्ता प्राप्त केली त्याच बरोबर या शहर तालुक्यातील अनेक युवकांना प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली.पंढरपूर शहर हे लाखभर लोकसंख्येचे शहर पण या तालुक्याची अर्थव्यवस्था शेतीवर तर शहराची बहुतांश अर्थव्यवस्था ही वारीच्या रुळावर धावणार्या पॅसेंजरप्रमाणेच वाटचाल करीत आलेली.पंढरीतील अकबर,न्यू अकबर आणि आणि सरगम हे सिनेमागृहे टप्प्याटप्याने बंद केले आणि या शहर तालुक्यातील तरुणाईला आपल्या घरातल्या इडियट बॉक्सवर लागेल तो सिनेमा पाहणे बंधनकारक केले.आणि हि कमरता लक्षात घेऊन अभिजित पाटील,अमर पाटील आणि बोरगावकर कुटूंबाने एकत्र येत डीव्हीपी मल्टिफ्लेक्सची सुरुवात केली आणि डीव्हीपी हा या शहर तालुक्यातील तरुणाईला भुरळ घालणारा आयकॉन ठरला.एवढ्यावरच न थांबता व या तालुक्यातील प्रस्थापित साखर कारखानदारांना मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध असतानाही आहे हे आयते कारखाने चालविणे कठीण होत असताना या पाटील बंधूनी उस्मानाबाद,नांदेड आणि नाशिक जिल्ह्यातील साखर कारखाने डीव्हीपी उधोगाच्या माध्यमातून घेऊन अवसानयात निघालेल्या या कारखान्यांना नवसंजीवनी दिली.तर डीव्हीपी गारमेंट्स,डीव्हीपी मॉल,डीव्हीपी इन्फ्रास्ट्रुक्चरच्या माध्यमातून अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. आणि त्यामुळेच अभिजित पाटील हे आज या शहर तालुक्यातील युवकांच्या गळयातील ताईत बनले आहेत,लोकप्रिय ठरले आहेत.
प्रगतीच्या शिखरावर आरुढ असतानाही कुठलीही हवा डोक्यात जावू न देता शांतपणे आणि सर्वांशी विन्रमतेने सन्मुख होत अभिजीत पाटील यांनी पंढरपुर शहर तालुक्याबरोबरच सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून सोलापूर जिल्हयातून राज्यातील मुंबई,पुणे,ठाणे यासह विविध जिल्हयात उद्योग, व्यवसाय,रोजगार यासाठी स्थलांतरीत सोलापूर जिल्ह्यातील तरुणाईशी जे नाते जोडले ते अतिशय भक्कम असून प्रत्येकाच्या सामुदायीक तसेच वैयक्तीक अडचणी सोडविण्यासाठी आपल्या उद्योग व्यवसायात व्यस्त असतानाही वेळात वेळ काढून वेळ दिला आहे त्यामुळेच ते आज अशा लोकांशी आबा या उपनामाने घरातीलच एक सदस्य ठरले आहेत.
पंढरपुर शहर व तालुक्याचे राजकारण आणि अर्थकारण याची वाट कायम वेगळी राहीली होती.शहरातील चार वार्या हे जवळपास 1980 च्या दशकापर्यंत या शहरातील बहुतांश नागरिकांच्या चेहर्यावर हसू फुलविण्याचे त्यांच्या घरातील चहूल पेटविण्याचे साधन ठरले.तर पंढरपूर तालुक्यात शेती,शेतमजुरी हाच जगण्याचा आधार होता.स्व.मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी विठ्ठलाची माफी मागून चंद्रभागा अडविली खरी पण त्यावर साकारलेल्या उजनी धरणाने निसर्गाच्या लहरीवराआयुष्य कंठत आलेला शेतकरी शेतकरी राजा म्हणून ओळखला जावू लागला.तर त्याच काळात स्व.औदुंबरआण्णांनी या तालुक्यात कृषी औद्योगीक क्रांती घडवून आणली ती विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची स्थापना करुन.मोहोळ तालुक्यातील येवती येथील मुलनिवासी असलेले स्व.औदुंबरआण्णा पाटील हे येवतीचे पाटील होते आणि पाटील हे नामनिधान म्हणजे गावाचा कर्ताधर्ता असा विश्वास आपल्या मातीतील गावगाड्याच्या इतिहासात नोंदला गेला आहे.पण स्व.आण्णांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर या तालुक्यातील शेतकर्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणले.आणि या तालुक्याने जी प्रगतीची झेप घेतली ती नक्कीच ऐतिहासीक ठरली आहे.पण निसर्गाने पाठबळ दिले तर चेहर्यावर हसू आणि निसर्गाने दगा दिला तर डोळ्यात अश्रू ही या तालुक्याची परिस्थीती मात्र गेल्या काही वर्षात सातत्याने पडलेल्या दुष्काळामुळे वारंवार निदर्शनास येत गेली.आणि त्यामुळेच शेतकर्यांच्या पोरांनी आता विविध उद्योगव्यवसायात पुढे यावे अशी भावना जाणकारांकडून व्यक्त होऊ लागली.आणि जे काळाचे पावले उचलून वाटचाल करतात त्या शेतकरी पुत्रांनी कधी प्रगत शेती तंत्र आत्मसात करुन तर प्रगतीच्या नव्या वाटेवार वाटचाल करण्यास सुरु केली आणि त्यात सर्वात आघाडीवर राहीले ते पंढरपुरचे उद्योजक युवा आयकॉन अभिजीत पाटील.
आपले महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण केल्यानंतर अभिजीत पाटील व अमर पाटील या बंधूनी कृषीउद्योगात आपले कर्तृत्व सिध्द करण्याचा निर्णय घेतला आणि याचाच एक भाग म्हणून टॅक्टर्स विक्री या व्यवसायाकडे त्यांनी लक्ष केंद्रीत केले आणि आज अल्पावधीत ते सोनालिका या ट्रॅक्टरचे गेल्या कित्येक वर्षापासून बेस्ट सेलर म्हणून ओळखले जातात.
शुन्यातून सुरुवात केलेला एखादा व्यक्ती उद्योगविश्वात मोठा होत गेल्यानंतर त्यांच्या बाबतीत एक वेळ अशी येते की त्यांना आपल्या सुखसमृध्दीपेक्षा आपण जास्तीत जास्त हातांना रोजगार देवू शकतो,जास्तीत जास्त लोकांच्या जीवनात सुखाचे दिवस आणू शकतो,जास्तीत जास्त तरुणांना दिशा दाखवू शकतो,प्रेरणा देवू शकतो याचा आनंद हा स्वत:च्या वैयक्तीक प्रगतीपेक्षा मोठी वाटू लागते आणि हाच खरा परिवर्तनाचा काळ असतो.दुसर्याच्या जीवनात सुखाचे दिवस आणण्यासाठी धडपडणार्याच्या पाठीशी देव असतो असे म्हणतात आणि घडलेही तसेच.सर्वांचे मने जिंकत अभिजीत पाटील हे प्रगतीचे अनेक शिखरे सर करु लागले.आज ते महाराष्ट्रातील एकमेव असे चेअरमन आहेत ज्यांच्या तालुक्यातील एकही सहकारी अथवा खाजगी साखर कारखाना गेल्या हंगामात सुरु होऊ शकला नाही परंतू त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो किलोमीटर अंतरावरील ती साखर कारखाने अतिशय यशस्वीपणे वाटचाल करीत आहेत.आणि कदाचीत त्यामुळेच अभिजीत पाटील यांनी पंढरपूरच्या राजकारणात सक्रीय व्हावे अशी सुप्त इच्छाही या तालुक्यातील युवक बाळगत असलेले दिसून आले.
आज अभिजीत पाटील हे धाराशीव साखर कारखान्याच्या उस्मानाबाद,नांदेड,नाशिक युनिटचे चेअरमन तथा डिव्हीपी नागरी सहकारी पतसंस्था उस्मानाबाद,समृध्दी ट्रॅक्टर्स पंढरपूर,हॉटेल विठ्ठल कामत पंढरपूर,डि.व्ही.पी.मार्ट पंढरपूर,डि.व्ही.पी.स्क्वेअरचे कर्ताधर्ता म्हणून ओळखले जात आहेत,एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जात आहेत.उद्योगविश्वात भरभरुन प्रगती करीत असलेले एक युवकांना प्रेरणादेणारे प्रेरणास्थान म्हणून ओळखले जात आहेत.पण या सार्या प्रगतीचे शिखर सर केले तरी अभिजीत पाटील यांनी यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली डि.व्ही.पी.उद्योग समुहाने आपले सामाजिक दायीत्व कधीही नाकारले नाही.उलट अनेक कठीण प्रसंगाच्या समयी,अनेक प्रेरक उपक्रमांसाठी,अनेक ठिकाणी मदतीसाठी तर नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी,दिलासा देण्यासाठी सदैव पुढे राहीला आहे.म्हणूनच कदाचित अभिजीत पाटील हे जिल्हयातील एकमेक असे उद्योेजक आहेत ज्यांनी आमचे नेतृत्व करावे अशी भावना एखाद्या शहर तालुक्यातील बहुसंख्या युवक करत आहेत.
डिव्हीपी उद्योग समुहाने कधी क्रिडा स्पर्धांचे प्रायोजक बनुन,कधी उद्योजक,स्थलांतरीत व्यवसायीक यांना मार्गदर्शन मदत करणार्या विविध उपक्रमांचे प्रमोटर बनुन तर कधी कोरोनामुळे उदभवलेला लॉकडाऊन असो अथवा आणखी कुठलीही नैसर्गीॅक आपत्तीच्या काळात पुढे केलेला मदतीचा हात असो आपले वेगळेपण नेहमीच सिध्द केले आहे.आणि त्यामुळेच डि.व्ही.पी.हा केवळ एक व्यवसायीक बॅ्रड नाही तर सर्वाच्या मनात निर्विवादपणे आपलकीचे नाते जोडणारा एक अभिमान ठरला आहे.
डि.व्ही.पी.उद्योग समुहाचे चेअरमन अभिजीत पाटील यांना पंढरी वार्ता परिवार व पंढरी वार्ता न्यूज नेटवर्क कढूनही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
– राजकुमार शहापूकर
(संपादक पंढरी वार्ता)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *