ताज्याघडामोडी

गुटखा आणला कोठून ? देणार होता कुणाला ? आणि भागीदार कोण ?

गुटखा आणला कोठून ? देणार होता कुणाला ? आणि भागीदार कोण ?

अन्न विभागाने फिर्यादीत नमूद केली सखोल चौकशीची अपेक्षा

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सचिन वसमळे यांना सांगोला रस्ता येथील हॉटेल गारवाच्या पाठीमागे दोन इसम अवैध गुटखा विक्री व वाहतूक करीत असल्याचे आढळून आले.त्यांनी सदर गाडी पकडल्याची माहिती माहिती तातडीने पंढरपूरचे अन्न निरीक्षक प्रशांत कुचेकर यांना भ्रमणध्वनिद्वारे दिली व तालुका पोलीस ठाणे येथे येण्याची विनंती केली.अन्न निरीक्षक कुचेकर यांनी पाहणी केली असता काळ्या रंगाच्या हिरो स्प्लेंडर वाहन एम एच 13 सीएक्स 2883 या वाहनात महाराष्ट्र राज्यात वाहतूक, विक्री, साठवणूक व निर्मितीसाठी प्रतिबंधित गुटखा भरून ठेवलेला आढळून आला असल्याचे स्पष्ट झाले. 
        या बाबत अन्न निरीक्षक कुचेकर यांनी  सदर गुन्ह्यातील वाहन चालक बंडू हनुमंत लवटे, वय 30 वर्ष, रा. निजामपूर, ता. सांगोला, जि. सोलापूर व त्याचा जोडीदार सोमनाथ पोपट लवटे, वय : वर्ष, रा. रा. निजामपूर, ता. सांगोला, यांच्या विरोधात  अन्न सुरक्षा अधिनियम शिक्षापात्र कलम 59 तसेच भादवि कलम 34,176,188 272,273,व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005मधील कलमानुसार सदर दोन आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली असून या प्रकरणातील सदर आरोपीनी सदर प्रतिबंधित साठा कोठून आणला, कोणाला देणार होते, अजून कोठे साठा करून ठेवला आहे का, या व्यवसायातील भागीदार कोण आहे याचा सखोल तपास करण्याची अपेक्षाही फिर्यादीत नमूद केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *