ताज्याघडामोडी

दिवसभर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ड्युटी रात्री पर्यावरण संरक्षण ! 

दिवसभर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ड्युटी रात्री पर्यावरण संरक्षण ! 

अवैध वाळू चोरीवर पोलीस उपविभागाची करडी नजर 

 आंबे व चिंचोली भोसे येथून  टिपर,ट्रॅक्टरसह दोन वाहने ताब्यात   

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या संचार बंदीचा अमल प्रभावीपणे व्हावा यासाठी दिवसभर पोलीस कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम १८८ नुसार कारवाई करीत असल्याचे दिसून येत आहे.याच अवैध दारू विक्री व गुटखा विक्रीवर पोलीस प्रशासन कारताना दिसून येत आहे.नुकतेच तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी आढीव येथे दीड लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्याची प्रशंसनीय कामगीरी केली आहे.मात्र या साऱ्या कारवाया करीत असतानाच दिवसभराच्या ड्युटीनंतर रात्रीच्या वेळी नदीकाठच्या विविध गावातील वाळू चोरी रोखण्यासाठीही पोलीस प्रशासन  कारवाई करताना दिसून येत आहे. पंढरपूर तालुक्यातील चिंचोली भोसे व आंबे येथे अवैध वाळू उपशावर कारवाई करीत एक टिपर व ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.मात्र हा सारा प्रकार घडत असताना महसूल विभागाचे स्थानिक कर्मचारी नक्की कुठे आहेत ? असा प्रश्नच आता उपस्थित केला जात आहे. 
         बुधवार दिनांक १ मार्च रोजी केलेल्या कारवाईत चिंचोली भोसे येथून अवैध वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर MH/13 AJ /9037  हा ताब्यात घेतला असून या प्रकरणी मालक मंगेश पवार व अज्ञात चालक यांच्या विरोधात ट्रँक्टर व डंपिग ट्रलीने मौजे चिंचोली भोसे ता. पंढरपुर या गावचे हद्दीतील भिमा नदीचे पात्रातील वाळु चोरी करीत असल्याने भा.द.वि.कलम 379,34व पर्यावरण कायदा कलम 9 व 15प्रमाणे  पो.ना. शिवशंकर हुंलजती यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत पो.हे.कॉ. शिंदे,पो.हे.कॉ.क्षिरसागरपो.हे.कॉ. बन्ने,पो.ना. भोसले यांनी सहभाग घेतला.
तर दुसरी कारवाई पंढरपूर तालुक्यातील आंबे येथे करण्यात आली असून पो.ना.बाबुराव भोसले यांनी दाखल केलेल्या फिर्यादी नुसार पो.स.ई. वसमळे यांच्या समवेत पो.ना.भोसले,पो.ना.मोरे,पो.ना. काळे हे नाईट राउंड करीत असताना सरकोलीवरुन आंबे गावात ग्रांमपचायत समोर आलो असता त्यांना समोरुन एक टिपर आलेला दिसला. आम्हास त्याचा संशय आल्याने तो टिपर थांबविला तेव्हा सदर टिपर बिगर नंबरचा टिपर हा ४ ब्रास अवैध वाळू वाहतूक करीत असल्याचे दिसून आले. सदर प्रकरणी 1)चालक शब्बीर खुशाल शेख वय 30 वर्षे रा. आंबे 2) राजु दत्तात्रय कोळी वय 21 वर्षे रा. दसुर ता. इंडी जि. विजापुर 3) तानाजी शिवाजी शिंदे रा. आंबे ता. पंढरपुर यांच्या विरोधात भा.द.वि.कलम 379,34व पर्यावरण कायदा कलम 9 व 15प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *