ताज्याघडामोडी

गरीब विदयार्थ्यांच्या आरटीई शाळा प्रवेश प्रक्रियेतील लाचखोरी उघड

खासगी शाळांमध्ये आरटीई अंतर्गत 2021-22 मध्ये पहिलीसाठी 25 टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये दरवर्षीप्रमाणे 25 टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे.या कायद्याअंतर्गत सर्व शाळांमधील 25 टक्के जागा राखून ठेवण्यात येतात आणि तिथं समाजातील वंचित, दुर्बल घटकातील मुलांना प्रवेश दिला जातो. एका दुर्बल गटातील मुलीला प्रथितयश शाळेत प्रवेश मिळाला होता; मात्र प्रवेश निश्चितीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यानं मुलीच्या आईकडे तब्बल 50 हजार रुपयांची लाच मागितली. या महिलेनं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानं या लाचखोर अधिकाऱ्याला सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडलं आहे.

RTE अधिकाराखाली शाळेत प्रवेश देण्यात आलेल्या मुलांच्या यादीत या मुलीचं नाव होतं. त्याकरता आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडं त्या मुलीच्या आईनं संपर्क साधला होता. त्यावेळी बोखरे यानं 50 हजार रुपये दिल्यास कागदपत्रे देण्याची अट घातली होती.त्यावर या मुलीच्या आईनं लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार नोंदवली. त्याची दखल घेत, या लाचखोर अधिकाऱ्याला पुराव्यासकट पकडण्याकरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचला आणि 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना बोखरे याला रंगेहाथ पकडण्यात आलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं बोखरे याला लाचखोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *