ताज्याघडामोडी

कौठाळी येथे अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या विशेष पोलीस पथकास धक्काबुकी व धमकी 

कौठाळी येथे अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या विशेष पोलीस पथकास धक्काबुकी व धमकी 

पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल 

एकीकडे पोलीस कर्मचारी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दिवसभर कर्तव्य बजावत असतानाच रात्रीच्या वेळी पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या गावातून अवैध वाळू उपसा होत असल्याचे प्रकार सातत्याने पोलीस कारवाईत उघडकीस येत आहेत. गावपातळीवर वाळू चोरी रोखण्याची जबाबदारी असेलेल्या मंडल अधिकारी,तलाठी,पोलीस पाटील यांनी दक्षता घेऊन पोलिसांचा ताण हलका करणे आवश्यक असतानाच कौठाळी येथे पुन्हा पोलिसांनीच कारवाई केली आहे. 
   या बाबत पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात उपिवभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील विशेष पथकाचे पो.कॉ.पंजाब इंद्रजित सुर्वे यांनी दाखल केलेल्या फिर्यादी नुसार कौठाळी हद्दीत काही इसम चंद्रभागा नदी पात्रातून वाळू करीत आहेत त्या ठिकाणी जावून त्या ठिकाणी कारवाई करा असे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी दिल्याने रात्री आठ वाजता फिर्यादी सुर्वे यांच्यासह पोलीस पो.ना. विशाल भोसले, पो.क.राहुल लोंढे, पो.काशिवशंकर हुलजंती व चालक पो. क विलास घाटगे हे इनामदार वस्ती समोर रोडवर, कौठाळी येथे खाजगी मोटार सायकलवरून पोहोचले असता तेथे वाळूने भरलेल्या ट्रलीसह एक ट्रक्टर एक इसम घेवून जात असल्याचे दिसल्याने त्यास थांबण्यास इशारा केला. सदर ट्रक्टर चालक ट्रक्टर बंद करून खाली उतरून पळू लागला असता त्यास थांबवले. त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सतिष भिंगारे, रा.कौठाळी, ता.पंढरपूर असे सांगीतले त्याचवेळी तेथे काळया रंगाचे युनिकर्न मोटर सायकलवरून नामदेव सुखदेव लेंडवे, रा. कौठाळी, ता.पंढरपूर हा इसम आला व कारवाईसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याजवळ येवून ट्रक्टरच्या समोर त्याची युनिकर्न मोटार सायकल आडवी लावून मोटर सायकलवरून खाली उतरून तुम्ही कोण आहात? तुम्ही सतिष भिंगारे यास कशाला पकडले आहे ? असे मोठ-मोठे आवाजात बोलून अंगावर येवून दहशत माजवू लागला त्यावेळी आम्ही पोलीस आहोत असे सांगून फिर्यादी पो.कॉ.सुर्वे यांनी शासकीय ओळखपत्र दाखविले व शासकीय कारवाईमध्ये अडथळा करू नका असे सांगीतले असता त्याने या गावचा मी सरपंच आहे, तुम्ही कारवाई केली तर मी गावातील पोरांना बोलवतो व मग तुम्हाला दाखवतो असे बोलून फिर्यादी सुर्वे यांना ढकलून दिले व कोणालातरी फोन लावू लागला. त्याचवेळी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यास ताब्यात घेतले व सदरबाबतची माहिती डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सो, पंढरपूर यांना फोनव्दारे माहिती देण्यात आली.
पो. ना. भोसले यांनी सदरचा वाळूने भरलेला ट्रलीसह ट्रक्टर व नामदेव लेंडवे हा घेवून आलेली युनिकर्न मोटार सायकल गुन्हयाचेकामी जप्त करून सदरची वाहने व मुद्देमाल पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे आवारात आणून लावली आहे. त्याचे वर्णन व किंमत खालील प्रमाणे-1)2,50,000 /- रु. एक निळया रंगाचा सोनालिका कंपनीचा मडेल नं. DI 60RXबिगर नंबरचा ट्रक्टर जु.वा.किं.अं.2) 50,000/-रू. एक बिगर नंबरची लाल रंगाची डंपींग ट्रली जु.वा.किं.अं.3) 35,000/- रू. एक काळया रंगाची युनिकर्न मोटर सायकल नं. एमएच 13 बीजे 4591 जु.वा. किं.अं.4) 6,000/- रू एक ब्रास वाळू असा एकूण किंमत 3,41,000/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी 1)सतिष भिंगारे, रा. कौठाळी, ता.पंढरपूर घेवून जात असताना त्यांचेवर कारवाई करणेकामी थांबवीले असता यातील आरोपीत नामे 2) नामदेव सुखदेव लेंडवे, रा. कौठाळी, ता.पंढरपूर याने आम्ही पोलीस असल्याचे त्यास सांगूनही त्याने आरेरावीची, दमदाटीची भाषा वापरून मला ढकलून देवून माझे व माझे समवेत असलेले पोलीस कर्मचारी यांचे शासकीय कामात अडथळा आणला आहे म्हणून माझी वरील दोन्ही इसम तसेच ट्रक्टर मालक यांचे विरूध्द भा.दं.वि.कलम 353,379,506,34 तसेच पर्यावरण संरक्षण कायदा कलम 9 व 15प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *