ताज्याघडामोडी

शेखर भोसले,माउली हळणवर,काशीनाथ लवटे यांच्यासह २४ जणांविरोधात ‘विठ्ठल’चे व्हा.लक्ष्मण पवार यांची फिर्याद 

शेखर भोसले,माउली हळणवर,काशीनाथ लवटे यांच्यासह २४ जणांविरोधात ‘विठ्ठल’चे व्हा.लक्ष्मण पवार यांची फिर्याद 

पगाराच्या पैशासाठी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा व डांबून ठेवल्याचा आरोप

 

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन लक्ष्मण पवार व संचालक विजयसिह देशमुख व दशरथ खळगे यांना  कारखान्याच्या कामगारांचा थकीत पगार द्या अन्यथा जीवे ठार मारू अशी धमकी दिली व कारखान्याच्या कार्यालयात डांबून ठेवत कुलूप ठोकले अशा आशयाची फिर्याद पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात  आली आहे . 
सदर फिर्याद पुढील प्रमाणे आहे 

लक्ष्मण नामदेव पवार वय. 69, धंदा. शेती, राहणार. चिलाईवाडी, ता. पंढरपूर मोबाईल नंबर 9822609006 समक्ष हजर राहुन फिर्यादी जबाब देतो की,मी वरील ठिकाणी राहणेस असुन शेती करतो. मी 1981पासुन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना, वेणुनगर, गुरसाळे ता. पंढरपूर या साखर कारखान्याचे संचालक असुन सध्या मी कारखान्याचा व्हाइस चेरअमन आहे म्हणुन काम पाहतो. दि. 12/03/2020 रोजी वार गुरूवारी यशवंतराव चव्हाण यांचे जयंती दिवस असल्याने श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना, वेणुनगर, गुरसाळे ता. पंढरपूर या साखर कारखान्यामधील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळयाजवळ त्यांचे जयंतीचे कार्यक्रमास सकाळी 09/20 वाजण्याचे सुमारास मी व सदर कारखान्याचे संचालक विजयसिंह बाळासाहेब देशमुख,श्री दशरथ पंढरीनाथ खळगे, संचालक श्री दिनकर दत्तात्रय पाटील, सेक्रेटरी श्री करपे बी.सी., टाईम ऑफिस अँसिस्टंट सुभाष जगताप व सदर कारखान्यातील इतर कर्मचारी हजर राहुन सकाळी 09:30 वाजताचे सुमारास कार्यक्रम पार पाडला. त्यावेळी तेथे 1) माऊली हळनवर रा. ईश्वरवठार, ता. पंढरपूर, 2) शेखर भोसले रा. इसबावी, पंढरपूर,3) काशिनाथ लवटे रा. गुरसाळे, ता. पंढरपूर, 4) सागर लक्ष्मण वाघमोडे रा. विठ्ठल हस्पीटल, पंढरपूर, 5) रामचंद्र ज्ञानोबा अंबुरे रा. इसबावी, पंढरपूर, 6) पोपट अंबादास शेळके रा. आष्ठी, ता. मोहोळ, 7) शाहीर बुजरूग इनामदार रा. कौठाळी ता. पंढरपूर, 8) बिभिषण लवटे रा. ईश्वरवठार, ता. पंढरपूर, 9) दत्तात्रय बाबुराव निर्मळ रा. तारापूर, ता. पंढरपूर, 10) रामदास सुखदेव आंद रा. तुंगत, ता. पंढरपूर, 11) जोतीराम सोपान कुंभार रा. तावशी, ता. पंढरपूर व इतर 15 अनोळखी इसमांनी संगनमत करून गैरकायदयाची मंडळी जमवुन मला तसेच व संचालक श्री दशरथ पंढरीनाथ खळगे यांना शिवीगाळी,दमदाटी व धक्काबुक्की करून आम्हाला दोघांना धरून पळवुन सदर कारखान्यातील चेअरमन साहेबांच्या कार्यालयात घेवुन जावुन कारखान्यातील कामगारांचे पगाराचे पैशाची मागणी करून, पैसे दिले तरच तुम्हाला सोडतो. नाहीतर तुम्हाला सोडत नाही असे म्हणुन जिवे ठार मारण्याची भिती निर्माण करून सदर कार्यालयाचे दरवाजास बाहेरून कुलुप लावुन आम्हाला डांबुन ठेवले. त्यानंतर एक तासभर वरील लोकांनी संचालक श्री विजयसिंह बाळासाहेब देशमुख, श्री दिनकर दत्तात्रय पाटील, सेक्रेटरी श्री करपे बी.सी., टाइम ऑफिस अँसिस्टंट सुभाष जगताप असे चेअरमन साहेबांच्या कार्यालयासमोर जावुन आम्ही वरील लोकांना विनंती केली त्यावेळेस माझी व संचालक श्री दशरथ पंढरीनाथ खळगे यांची सुटका वरील लोकांच्या ताब्यातुन केली .त्यानंतर दिनांक 13/03/2020 रोजी शुक्रवारी दुपारी 2/00 वाजण्याचे सुमारास वरील लोकांनी गैरकायदयाची मंडळी जमवुन सदर कारखानास्थळावर येवुन बेकायदेशिर रित्या कारखान्याच्या कार्यालयातील कर्मचारी लोकांना धमकावुन सदर कार्यालयातुन बाहेर काढुन मला व संचालक दशरथ खळगे यांना शिवीगाळ जिवे मारण्याची धमकी देऊन धक्काबुक्की करून कारखान्याचे चेरमन यांचे केबिंनमध्ये घेऊन जाऊन तुम्हा कामगाराचे पैसे दिले नाहीतर तुम्हाला सोडणार नाही असे म्हणून जिवेठार मारण्याची धमकी दिली. व त्यानंतर दुपारी 03/30 वाजण्याचे सुमारास सदर कारखान्याचे पेट्रोल पंपात जावुन पेट्रोल पंपातील कर्मचा-यांना धमकावुन सदरचा पेट्रोल पंप बंद पाडले आहे. व सदर कारखान्यातील बग्यास भरून बाहेर जाणारे 8-9 मालट्रक अडवुन सदर कारखान्याचे गेट बंद करून घेवुन सदरचे बग्यासने भरलेले 8-9 मालट्रक बाहेर जावु दिले नाही. व संचालक मंडळास व चेअरमन यांना शिवीगाळी करून धमकी दिली आहे. मी आरोपीतांचे भिती पोटी आज रोजी पर्यत तक्रार देण्यास आलो नाही. परंतु वरिल आरोपीतांनी परत असे कृत्य करू नये म्हणून मी आज रोजी त्यांचे विरूध्द तक्रार देण्यास आलो आहे म्हणुन माझी 1) माऊली हळनवर रा. ईश्वरवठार, ता. पंढरपूर, 2) शेखर भोसले रा. इसबावी, पंढरपूर, 3) काशिनाथ लवटे रा. गुरसाळे, ता. पंढरपूर, 4) सागर लक्ष्मण वाघमोडे रा. विठ्ठल हस्पीटल, पंढरपूर, 5) रामचंद्र ज्ञानोबा अंबुरे रा. इसबावी, पंढरपूर, 6) पोपट अंबादास शेळके रा. आष्ठी, ता. मोहोळ, 7) शाहीर बुजरूग इनामदार रा. कौठाळी ता. पंढरपूर, 8) बिभिषण लवटे रा. ईश्वरवठार, ता. पंढरपूर, 9) दत्तात्रय बाबुराव निर्मळ रा. तारापूर, ता. पंढरपूर, 10) रामदास सुखदेव आंद रा. तुंगत, ता. पंढरपूर, 11) जोतीराम सोपान कुंभार रा. तावशी, ता. पंढरपूर व इतर 15 अनोळखी इसमांविरूध्द फिर्याद आहे.माझा वरील फिर्यादी जबाब मी वाचुन पाहिला. तो माझ्या सांगण्याप्रमाणे बरोबर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *