Uncategorized

लोटस इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी प्राची पवार शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दुसरी

कासेगाव (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कुल मधील विद्यार्थिनी प्राची पवार हिने संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सी.बी.एस.ई.आणि आय.सी.एस.ई. इंग्लिश मिडीयम स्कूलमधून राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे.

 

         या परीक्षेसाठी एकूण १३ विद्यार्थी पात्र झाले आहेत. परंतु इयत्ता आठवी मधील विद्यार्थिनी प्राची पवार हिने शिष्यवृत्ती परीक्षेत ८९.२६ टक्के गुण घेऊन राज्यात द्वितीय क्रमांक संपादन केला. त्यामुळे लोटस इंग्लिश स्कूलचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी महाराष्ट्रातील सी.बी.एस.सी.आणि आय.सी.एस.ई.बोर्डाच्या  शाळांनी सहभाग घेतला होता. कासेगाव सारख्या ग्रामीण भागात लोटस इंग्लिश स्कूलची स्थापना झाल्यापासून शाळेचे सर्व शिक्षक ज्ञानदानाबरोबरच विद्यार्थ्याच्या करिअरसाठी आवश्यक बाबींची उत्तमरित्या तयारी करून घेत आहेत. मागील दीड-दोन वर्षापूर्वी जरी कोरोनाचा काळ असला तरी शिक्षकांनी राज्य शासनाच्या नियमानुसार ऑनलाईन पद्धतीने शिष्यवृत्तीचे विशेष तास घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि शासनाच्या नियमानुसार परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने झाल्या.’ अशी माहिती लोटस इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या डॉ.जयश्री भोसले यांनी दिली.

 

प्राची पवार हिचा सत्कार स्वाईपच्या विश्वस्त सौ. मिनाक्षी रोंगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्वाईपच्या विश्वस्त सौ.वंदना रोंगेविश्वस्त सौ. अलका बागलसौ. ऐश्वर्या रोंगे आदी उपस्थित होत्या. तसेच गुणवंत विद्यार्थिनी प्राची पवार आपल्या भाषणात बोलताना म्हणाली की, ‘मला सर्व शिक्षकांचे व पालकांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले त्यामुळे मी हे यश संपादन करू शकले.’ तसेच पुढील शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देखील दिल्या. या परीक्षेसाठी विभाग प्रमुख एस.ए.दिवसेशिक्षिका एल.एम.बोडकेआर.सी. सांगोलकर, डी.ए. वायदंडे यांनी परिश्रम घेतले. कार्यंक्रमाचे सूत्रसंचालन एस.आर.शिंदे तर आभार ए.के.शेख यांनी मानले. या गुणवंत विद्यार्थिनीचे संस्थेचे अध्यक्ष एच.एम.बागलउपाध्यक्ष बी.डी.रोंगेसंस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगेज्येष्ठ विश्वस्त व खजिनदार दादासाहेब रोंगे व पदाधिकारीशिक्षक वर्गशिक्षकेतर कर्मचारीपालक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *