ताज्याघडामोडी

फॅबटेक इंजिनिअरिंग मध्ये एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड रिसर्च, सांगोला मधील ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट विभागांतर्गत सॉफ्टवेअर उद्योगातील अलीकडील ट्रेंड आणि फ्रेशर्सच्या अपेक्षा या विषयी एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती,अशी माहिती प्राचार्य डॉ.रविंद्र शेंडगे यांनी दिली.

सॉफ्टवेअर उद्योगातील अलीकडील ट्रेंड आणि फ्रेशर्सच्या अपेक्षा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुणे येथील गिरी टेकहब प्रा.लि. चे संचालक मा. श्री .आदिनाथ गिरी उपस्थित होते. गिरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कि, विद्यार्थ्यांनी आय.टी.मधील आवश्यकता समजून घेणे आवश्यक आहे.त्याबरोबरच नवीन तंत्रज्ञानाबद्दलचे ज्ञान समजून घ्यावे. तसेच विद्यार्थ्याच्या अंगी तांत्रिक कौशल्य असणे  महत्त्वाचे आहे, आणि त्यांनी विद्यार्थ्यांना  आगामी भरती ट्रेंडबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या कार्यशाळेसाठी कॉम्पुटर इंजिनिअरिंग विभागाचे व ए.आय. अॅड डी. एस. इंजिनिअरींग विभागाचे २४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदिविला होता.

हि कार्यशाळा संस्थेचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रुपनर व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, कार्यकारी संचालक मा.श्री.दिनेश रूपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे, प्राचार्य डॉ.रविंद्र शेंडगे, डीन अँकँडमीक डॉ. वागीशा माथाडा, ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा.धनंजय शिवपूजे,कॉम्पुटर इंजिनिअरींग विभागाचे ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट समन्वयक प्रा. अतिश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *