ताज्याघडामोडी

पंढरपुरात भारतरत्न मा.पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ३२ व्या पुण्यस्मरणा निमित्त आदरांजली अर्पण

कॉग्रेस प्रेमी प्रियदर्शनी विचार मंचकडून स्व.राजीव गांधींच्या आठवणींना उजाळा

देशाचे माजी पंतप्रधान,आधुनिक भारताच्या स्वप्नाची मूहूर्तमेढ रोवणारे भारतरत्न स्व.राजीव गांधी यांच्या ३२ व्या पुण्यस्मरणा निमित्त पंढपूरपुरात स्टेशन रोड आढवळकर कार्यालय पंढरपूर येथे कॉग्रेस प्रेमी प्रियदर्शनी विचार मंचच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली.कॉग्रेसचे जेष्ठ नेते माजी तालुकाध्यक्ष बजरंग बागल यांच्या हस्ते स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.      

यावेळी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अध्यक्ष सुहास भाळवणकर,कॉग्रेसचे मा.शहर उपाध्यक्ष   मिलिंद आढवळकर यांनी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या आठवणींना उजाळा देत देशात संगणक युगाची सुरुवात व दूरसंचार प्रणालीत सी डाक यंत्रणेचा अवलंब राजीव गांधी यांच्या प्रोत्साहन आणि प्रेरणेतून झाल्याचे सांगत आधुनिक भारताच्या उभारणीची,देशाला २१ व्या शतकांत प्रवेश करताना समृद्ध भारत बनविण्याचे स्वप्न राजीव गांधी यांनी पाहिले होते याची आठवण करून दिली.     

यावेळी कॉग्रेसचे शहर अल्पसंख्याक अध्यक्ष अशफाक सय्यद,ब्राम्हण सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय बडवे,मा.नगरसेवक सुधीर धुमाळ,शहर उपाध्यक्ष नागनाथ अधटराव,संतोष ताटे,सुनील उत्पात,देवानंद इरकल,पृथ्वीराज चव्हाण,मोहन जाधव,आबा साप्ताळ आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुहास भाळवणकर यांच्या वतीने कऱण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *