ताज्याघडामोडी

“सर्व्हेक्षणानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून मतदारांची यादी जाहीर, नवीन मतदारांमध्ये झाली वाढ”

२०२४ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. या धरतीवर राज्य निवडणूक आयोगाकडून विशेष सर्व्हेक्षणाचा उपक्रम राबविण्यात आला होता. हा उपक्रम २७ ऑक्टोबर २०२३ ते २३ जानेवारी २०२४ यादरम्यान राबविण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी (२३ जानेवारी २०२४) रोजी मतदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली. ही यादी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली. दरम्यान, मतदारांची ही यादी मतदार नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रावर, सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिलीय.

अद्ययावतीकरण प्रक्रिया सुरुच राहणार : सर्व्हेक्षणा दरम्यान राज्यातील नवीन मतदार वाढला आहे. नवीन मतदारांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहेत. तसेच मतदारांची ही नवीन यादी राज्यातील राजकीय पक्षांना देखील देण्यात येणार आहे. तसेच मतदारांनी आपले नाव बरोबर आहे का, किंवा नावात काही बदल करायचा असल्यास संकेतस्थळावर करु शकता. तसेच जरी मतदार अंतिम यादी प्रसिद्ध झाली असली तरी, अद्ययावतीकरण प्रक्रिया ही निरंतर सुरू राहणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिलीय.

एप्रिलमध्ये १८ वर्षे पूर्ण असणाऱ्या मतदान करता येणार : मतदार व्होटर हेल्प लाईन ॲपवर जाऊन मतदान केंद्राचा पर्याय निवडू शकता. तसेच महत्त्वाचे म्हणजे ज्या तरुण किंवा तरुणीच वय एप्रिल महिन्यात १८ वर्षे पूर्ण होणार आहेत, अशा तरुण-तरुणींना आगाऊ नोंदणी करता येणार आहे. तसेच त्यांनाही एप्रिलनंतर मतदान करता येणार आहे. यामुळं नवीन मतदारांच्या संख्येत वाढ होणार आहे. ही मतदार यादी अद्ययावत करून, संकेतस्थळावर आणि मतदार केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं देशपांडे यांनी सांगितलंय.

एकूण मतदारांची संख्या ९ कोटी १२ लाख ४४ हजार ६७ : या सर्व्हेक्षण उपक्रमांतर्गत २० लाख २१ हजार ३५० मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. तसेच ऑक्टोबर २०२३ मध्ये मतदार यादीत २४ लाख ३३ हजार ७६६ मतदारांची नाव नोंदणी झाल्या. अंतिम मतदार यादीत ४ लाख १२ हजार ४१६ मतदारांची वाढ झाली आहे. एकूण मतदारांची संख्या ९ कोटी १२ लाख ४४ हजार ६७९ इतकी झालेली आहे. यामध्ये ३ लाख ०८ हजार ३०६ स्त्री मतदारांची नोंद झाली आहे, तर १ लाख ०१ हजार ८६९ पुरुष मतदार आहेत. तसेच ५७२ तृतीयपंथी मतदारांची वाढ झालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *