ताज्याघडामोडी

तुमच्या मोबाईलमधील ‘हे’ App आहेत Fake; सरकारला यादी देत RBI कडून तातडीनं बंदीचे आदेश

हातात स्मार्टफोन असणाऱ्या अनेरकांच्याच मोबाईलमध्ये असे काही अॅप्स असतात जे बऱ्याचदा अधिकृत नसतात. सध्या अशाच अॅपवर केंद्र सरकारकडून कारवाई करण्यात येत असून, टप्प्याटप्प्यानं हे अॅप बंद केले जाणार आहेत.

केंद्रीय अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेच्या वतीनं आता बनावट अॅपच्या माध्यमातून युजर्सची फसवणूक करणाऱ्या अनेक Apps च्या विरोधात बडगा उगारण्यात आला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी याबाबतच्या माहितीला दुजोरा देत अधिकृत आणि विश्वासार्ह अॅपची यादी शासनाकडे सुपूर्द केली आहे. 

IT मंत्रालयाकडून लवकरच अशा बनावट Loan Apps वर कठोर कारवाई केली जाणार आहे. ज्या अॅपची नावं या विश्वासार्ह अॅपच्या यादीत नाही, त्यांच्यावर क्षणाचाही विलंब न लावता कारवाई करण्यात येणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरातबाजी करत कर्ज देण्याची फसवी हमी देणाऱ्या अॅपसंदर्भात आता सरकारच्या माध्यमातूनही सावध करणारा संदेश जारी करण्यात आला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *