ताज्याघडामोडी

आता डिप्कोवॅनसह घरीच स्वता अँटीबॉडी टेस्ट करा, जाणून घ्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) ची लॅब डिफेन्स इन्स्टीट्यूट ऑफ फिजियोलॉजी अँड अलाईड सायन्सेस (डीआयपीएएस) ने दिल्ली येथील फर्म वॅनगार्ड डायग्नोस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत मिळून DIPCOVAN, COVID-19 अँटीबॉडी डिटेक्शन किट तयार केला आहे.

अँटीबॉडी डिटेक्शन किट कोविड संबंधित अँटीजन ओळखण्यासाठी मानवी प्लाझ्मामध्ये आयजीजी अँटीबॉडीची गुणात्मक ओळख पटवण्यासाठी डिझाईन केले आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) द्वारे एप्रिल 2021 मध्ये किटला मंजूरी देण्यात आली आहे. डीआरडीओनुसार, डिप्कोवॅन वेगाने रिझल्ट देतो कारण एक टेस्ट करण्यासाठी केवळ 75 मिनिटे लागतात.

हे 18 महिन्याच्या सेल्फ लाइफसोबत येते.

आयसीएमआरच्या डीआरडीओच्या वक्तव्यानुसार, लाँचच्या वेळी सहजपणे उपलब्ध स्टॉक 100 किट (सुमोर 10,000 टेस्ट) असेल, ज्याची उत्पादन क्षमता लाँचच्या नंतर 500 किट/महिना असेल. हे सुमारे 75 रुपये प्रति महिना टेस्टवर उपलब्ध होण्याची आशा आहे. हे किट कोविड-19 महामारी विज्ञान समजून घेणे आणि एखाद्या व्यक्तीच्या मागील सार्स-कोव्ह-2 जोखीमचा आढावा घेण्यासाठी खुप उपयोगी आहे.

वक्तव्यात पुढे म्हटले आहे की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काळाची गरज असलेल्या या किटच्या डिझाईनसाठी डीआरडीओच्या प्रयत्नांचे कौतूक केले आहे. हे किट जूनच्या पहिल्या आठवड्यापासून बाजारात उपलब्ध होईल. वॅनगार्ड डायग्नोस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडने हे किट शोधले असून हिच फर्म उत्पादन करणार आहे.

कसे काम करते किट?

हे कोविड अँटीबॉडी डिटेक्शन किट आहे. याद्वारे समजू शकते की, तुम्ही घातक कोरोना व्हायरसच्या संपर्कात येऊन गेला आहात किंवा नाही. तुम्ही अँटिबॉडीचा फॉर्म केला आहे किंवा हे समजू शकते. हे किट व्हायरसचे स्पाईक आणि न्यूक्लियोकॅप्सिड प्रोटीनला ओळखते. डिटेक्शन 97 टक्केच्या हाय सेन्सिटिव्हिटी आणि 99 टक्केच्या वैशिष्ट्यासह येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *