ताज्याघडामोडी

डिसेंबरमध्ये 18 दिवस बँका बंद राहणार, वाचा यादी

सुट्टी म्हटलं सगळ्यांना आनंद होतो. शाळकरी मुले असोत, कॉर्पोरेट कर्मचारी असोत किंवा सरकारी कर्मचारी असोत. सुट्ट्या प्रत्येकाला आवडतात. डिसेंबर महिन्यात बँकांना तब्बल 18 दिवस सुट्टी असणार आहे. जर तुम्हाला बँकेत काही महत्त्वाचे काम असेल आणि त्या दिवशी बँक बंद असेल तर तुमचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे ही सुट्टयांची यादी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

RBIच्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, डिसेंबर 2023 मध्ये 18 दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये शनिवार आणि रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे. तसेच, काही सुट्ट्या केवळ विशिष्ट प्रदेश किंवा राज्यासाठी असणार आहेत. डिसेंबरमध्ये ख्रिसमस सण असतो. त्यामुळे बहुतेक ठिकाणी या दिवशी बँका बंद असतात.

सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे

1 डिसेंबर – नागालँडचा स्थापना दिन असल्याने नागालँडमध्ये बँका बंद असतील

3 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

4 डिसेंबर- सेंट फ्रान्सिस दिनानिमित्त गोव्यात बँका बंद राहतील.

9 डिसेंबर – दुसरा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)

10 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

12 डिसेंबर – मेघालयमध्ये पो-टोगन नेंगमिंजा संगमा यांच्या जन्म तिथीनिमित्त बँका बंद राहतील.

13 डिसेंबर – सिक्कीममध्ये लोसुंग/नामसुंग

14 डिसेंबर – सिक्कीममध्ये लोसुंग/नामसुंग सणामुळे बँका बंद राहतील.

17 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

18 डिसेंबर – यू सोसो थाम यांची पुण्यतिथीनिमित्त मेघालयात बँका बंद राहतील.

19 डिसेंबर- गोवा मुक्ती दिनानिमित्त गोव्यात बँका बंद राहणार आहेत.

23 डिसेंबर – चौथा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)

24 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

25 डिसेंबर – नाताळनिमित्त सर्व राज्यांमध्ये बँका बंद राहतील.

26 डिसेंबर – मिझोराम, अरुणाचल प्रदेश, मेघालयमध्ये ख्रिसमस सणानिमित्त बँका बंद राहतील.

27 डिसेंबर – अरुणाचल प्रदेशमध्ये ख्रिसमस सणानिमित्त बँका बंद राहतील.

30 डिसेंबर – यू किआंग नांगबा यांच्या जन्म तिथीनिमित्त मेघालयातील बँका बंद राहतील.

31 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *