कार्यक्रमात शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी खास बातचित करण्यात आली. यावेळी त्यांनी शिक्षण शेत्रातील अनेक मुद्द्यांवर मनमोकळेपणानं बातचित केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र बोर्ड दहावी, बारावीच्या परीक्षांच्या निकालाबाबत महत्त्वाची माहिती दिली. बोर्डाचे निकाल येत्या 15 दिवसांत जाहीर करु असं ते म्हणाले. तसेच, निकाल उशीरा लागल्यामुळे त्यानंतरची प्रवेश प्रक्रिया व्यवस्थितपणे हाताळण्याचा प्रयत्न करु असंही ते म्हणाले […]
दीप्ती काळे या महिलेने पुण्यातील ससून रुग्णालयाच्या 8व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. दीप्ती काळे ही महिला मोक्क्याच्या गुन्ह्यातील आरोपी होती. तिच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. दीप्ती काळे हिच्यावर पुण्यातील नामवंत सराफासह अनेक नागरिकांना ब्लॅकमेल केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच खंडणीचाही तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दीप्ती काळेवर […]
एटीएमसाठी कॅश पुरवठा करणाऱ्या व्हॅनमधून कर्मचाऱ्यांनेच तब्बल एक कोटी पाच लाखांची रक्कम घेऊन पसार झाल्याची घटना नंदुरबार शहरातून समोर आली आहे. नंदुरबार शहरातील धुळे चौफुली परिसरातून ही समोर आली असून तब्बल दोन तासांनी पोलिसांना या बाबत माहिती दिली. तोपर्यंत आरोपी पळ काढण्यात यशस्वी झाला. आरोपीचा शोध घेण्यासाठी जिल्ह्याभरात पोलीस दलाने ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. पोलीस […]