ताज्याघडामोडी

गृहमंत्र्यांची बैठक संपली, फडणवीसांच्या आरोपाबाबत सर्व कागदपत्रं सादर!

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्टिंग ऑपरेशनचं पेन ड्राईव्ह सादर करून एकच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सुषमा चव्हाण यांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बोलावून घेतले होते. या बैठकीत सुषमा चव्हाण यांनी सर्व कागदपत्र सादर केल्याची माहिती समोर आली आहे.

गिरीश महाजन प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केल्यानंतर पुण्याच्या एसीपी तपास अधिकारी सुषमा चव्हाण या पुण्यातून थेट मुंबईत दाखल झाल्यात. सकाळी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेतली आणि संपूर्ण माहिती दिली.

त्यानंतर सुषमा चव्हाण आणि संजय पांडे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. यावेळी सुषमा चव्हाण यांनी आपल्यासोबत आणलेली कागदपत्र गृहमंत्र्यांकडे सुपूर्द केली आहे. सुषमा चव्हाण यांनी पुणे कार्यलयातून सर्व कागदपत्रं आणली होती.

दरम्यान, या बैठकीआधी दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. काल सभागृहात विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या प्रश्नावर आज उत्तर देणार होतो. त्यासाठी तयार होतो. पण त्यांनी मागणी केली होती की, उद्या चर्चा व्हावी.

त्यामुळे मी उद्या उत्तर देईल. त्यांनी खरेतर कायदा सुव्यवस्था यावर बोलायचे होते. पण ते त्यांच्या कर्तव्यापासून दुर गेले आहे, उद्या माझ्या उत्तरानंतर दुध का दुध पानी का पानी होईल, ‘करारा जवाब मिलेगा’ असं म्हणत दिलीप वळसे पाटील यांनी भाजपला इशारा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *