Uncategorized

न्यु सातारा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी माहिती अधिकार कार्यशाळा संपन्न

न्यु सातारा समूह मुंबई संचलित न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट पॉलीटेक्निक कॉलेज कोर्टी येथे माहितीच्या अधिकाराचा वापर या संदर्भातील कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी संपन्न झाला. माहितीच्या अधिकाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमासाठी कॉलेजचे प्राचार्य श्री विक्रम लोंढे सर, उपप्राचार्य विशाल बाड सर सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते .कार्यक्रमाच्या सुरुवातीस, कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मा. सचिन पुरी सर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून पाहुण्यांचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला व आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दिवाणी व फौजदारी न्यायालय पंढरपूर येथे वकील म्हणून कार्यरत असणाऱ्या ऍड. वंदना कोष्टी या उपस्थित होत्या.  

अध्यक्षीय भाषणात ऍड.कोष्टी यांनी माहितीचा अधिकार हा कायदा, त्याची गरज व तो केव्हा वापरायचा याची महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजाराम निकम साहेब यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे प्रतिनिधी मा. श्री ज्ञानेश्वर शेडगे साहेब यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.सचिन पुरी सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *