ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या ८ विद्यार्थ्यांची एक्सेंचर कंपनीत निवड

पंढरपूर: प्रतिनिधी

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन.सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात शेवटच्या वर्षात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या ८ विद्यार्थ्यांची जगातील नामवंत असलेल्या “एक्सेंचर” कंपनीत कॅम्पस मुलाखतीद्वारे निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

अभियांत्रिकी शिक्षणात अल्पावधितच नावलौकिक संपादित करून अभियांत्रिकी शिक्षणाची गुणवत्ता सिद्ध करून जगातील नामांकित कंपनीत विद्यार्थ्यांना नोकऱ्या उपलब्ध करून पंढरपुर सिंहगड महाविद्यालयाने अभियांत्रिकी शिक्षणात दमदार वाटचाल केली आहे. सिंहगड संस्थेतील शिक्षक विद्यार्थ्यांना तन-मन-धनाने ज्ञान दानाचे काम करीत आहेत. गुणवत्ता पुर्ण शिक्षण हेच सिंहगड संस्थेचे ध्येय आहे. विद्यार्थ्यांची कला ओळखुन शिक्षण देणाऱ्या पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधुन आज हजारो विद्यार्थी मोठ-मोठ्या जगातील नामांकित आय टी कंपनीत नोकरी करीत आहेत. पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील दर्जेदार शिक्षणप्रणाली मुळे प्रत्येक विद्यार्थ्यांची सिंहगडला पसंती असून स्टार इंजिनिअर तसेच स्मार्ट महाविद्यालय स्मार्ट इंजिनिअर फक्त पंढरपूर सिंहगड मध्ये घडविले जातात. म्हणूनच आज सिंहगड मधील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात नामांकित आय टी कंपनीत निवडले जात आहेत.

“एक्सेंचर” हि डब्लिन येथे स्थित आयरिश-अमेरिकन व्यावसायिक सेवा देणारी कंपनी आहे. हि कंपनी माहिती तंत्रज्ञान सेवा आणि सल्लामसलत मध्ये विशेष आहे. एक्सेंचर हि कंपनी फाॅर्च्युन ग्लोबल ५०० कंपन्यांमधील एक कंपनी असुन या कंपनीत ७ लाखांहून अधिक इंजिनिअर्स काम करीत आहेत. 

याशिवाय जगातील प्रमुख दहा कंपन्यांमध्ये समावेश असलेल्या एक्सेंचर कंपनीत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील अथर्व नितीन परिचारक, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील सौरभ बाळू होनमाने, इशा प्रकाश गुंड, उमा सिताराम गायकवाड, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील अजिंक्य सुरेश कोळवले, अविनाश विजय शिंदे, अथर्व राम माने आणि श्रीवरद भारत चव्हाण आदी ८ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्हूवद्वारे निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एक्सेंचर कंपनीकडून ४.५० ते ६.५ लाख वार्षिक पॅकेज मिळणार आहे. या निवडीमुळे पालकांतून आनंदी वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *