ताज्याघडामोडी

ईडीकडून घोटाळ्याप्रकरणी दोन चार्जशीट दाखल, राज्यातील बड्या १४ नेत्यांचा समावेश

जरांडेश्वर सहकारी साखर कारखाना या प्रकरणात अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुमित्रा पवार यांचे नाव जोडण्यात आलं होत. मात्र, अजित पवार यांच्या शपथविधापूर्वी अजित पवार आणि सुमित्रा पवार यांचे नाव वगळण्यात आलं होतं. ईडीच्या आरोपपत्रात राम गणेश गडकरी साखर कारखाना, अहमदनगर प्रकरणी प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी), प्रदीप देशमुख (काँग्रेस), यांच्याविरुद्ध चार्जशीट दाखल करण्यात आलाय. जालना को-ऑपरेटिव्ह सहकारी बँक लिमिटेड प्रकरणी अर्जुन खोतकर, समीर मुळे, आणि जुगलकिशोर तापडिया यांच्याविरुद्ध आज चार्जशीट दाखल करण्यात आलय. तनपुरे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री होते.

आरोपींमध्ये पिता-पुत्रांसह माजी राज्यमंत्री आणि काँग्रेस नेते रणजीत देशमुख, शिवसेना नेते अर्जुनराव पंडितराव खोतकर, बांधकाम व्यावसायिक जुगल किशोर तापडिया आणि उद्योगपती पद्माकर मुळ्ये यांचादेखील समावेश आहे. 24 ऑगस्ट आणि 25 ऑगस्ट रोजी दोन पुरवणी आरोपपत्रे ईडीकडून विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ईडीनं सहकारी साखर कारखाना आणि सहकारी सूत गिरणीमधील कथित घोटाळ्याशी संबंधित आरोपपत्र दाखल केलय. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *