ताज्याघडामोडी

सप्टेंबर महिन्यात १६ दिवस बँका बंद राहणार; वाचा सुट्टयांची यादी

आपले अनेक आर्थिक व्यवहार बँकेशी संबंधित असतात. आता डिजिटल आणि ऑनलाईन जगतात बँकेत जाण्याचे काम कमी झाले असले तरी बँकेत जावेच लागते. व्यवहार ऑनलाईन झाले असले तरी कर्ज प्रकरण अथवा इतर अनेक कामे बँकेत जाऊनत करावी लागतात.

आता सणासुदीचा काळ सुरु होत आहे. सुट्यांसोबत आनंदाचा काळ आहे. सप्टेंबर महिन्यात गुलाबी नोटा बदलण्याची शेवटची संधी आहे. त्यासाठी बँकेत जावे लागेल. त्यामुळे सुट्टी कधी आहे, हे पाहूनच बँकेत गेल्यास नाहकची चक्कर टळेल. सुट्यांचा अंदाज घेत, लवकरात लवकर काम पूर्ण करा. भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या सोयीसाठी वार्षिक सुट्यांची यादी जाहीर केली आहे. सप्टेंबर महिन्यात सुट्यांची दखल घेत काम उरकून घ्या.

या दिवशी राहतील बँका बंद

3 सप्टेंबर 2023 : रविवार असल्याने बँकेचे शटर डाऊन असेल

6 सप्टेंबर 2023 : श्रीकृष्ण जन्माष्टमी (भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, पाटणा)

7 सप्टेंबर 2023 : जन्माष्टमी / श्री कृष्ण अष्टमी (देशातील बहुतेक ठिकाणी सुट्टी)

9 सप्टेंबर 2023 : दुसरा शनिवार असल्याने बँकांचे कामकाज बंद

10 सप्टेंबर 2023 : रविवार असल्याने बँकेला सुट्टी असेल

17 सप्टेंबर 2023 : रविवार असल्याने बँकेचे शटर डाऊन असेल

18 सप्टेंबर 2023 : विनायक चतुर्थी (बंगळुरु, हैदराबाद)

19 सप्टेंबर 2023 : गणेश चतुर्थी (अहमदाबाद, बेलापूर, भुवनेश्वर, मुंबई, नागपूर, पणजी)

20 सप्टेंबर 2023 : गणेश चतुर्थी (दुसरा दिवस), भुवनेश्वर, पणजी

22 सप्टेंबर 2023 : श्री नारायण गुरु समाधी दिन (कोची, तिरूवनंतपुरम)

23 सप्टेंबर 2023 : चौथ्या शनिवारमुळे बँका असतील बंद

24 सप्टेंबर 2023 : रविवार असल्याने बँकेचे कामकाज होणार नाही

25 सप्टेंबर 2023 : श्रीमंत शंकरदेव यांची जयंती (गुवाहाटी)

27 सप्टेंबर 2023 : मिलाद-ए-शरीफ (जम्मू, कोची)

28 सप्टेंबर 2023 : ईद-ए-मिलाद / ईद-ए-मिलादुन्नबी (बारा वफत)

29 सप्टेंबर 2023 : ईद-ए-मिलाद-उल-नबी नंतर इंद्रजात्रा/शुक्रवार (गंगटोक, जम्मू, श्रीनगर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *