ताज्याघडामोडी

धक्कादायक! कॉफी शॉपमध्ये सुरू होते गैरकृत्य; पोलिसांना मिळाली गुप्त माहिती, टाकली धाड अन्…

नवीन जालना भागातील आझाद मैदान येथे थिंकिंग कॅफे छोटेखानी दुकानात कॉपी सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना खबऱ्याने दिली होती. आझाद मैदान संकुलनातील थिंकिंग कॅफे या कॉफी शॉपमध्ये महाविद्यालयीन मुला-मुलीकडून कॉफी शॉपच्या नावाखाली ५०० रुपयाच्या मोबदल्यात छोट्या खोल्या उपलब्ध करून दिल्या जातात. त्या जागेमध्ये मुला मुलींना हॉटेलच्या बेडरुमसारखा वापर करू दिला जातो, अशी खात्रीलायक माहिती प्राप्त झाल्याने सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी या प्रकाराची खात्री करून आज दुपारी अचानक या कॉफी सेंटरवर छापा मारला. तेव्हा तिथे ५ तरुण आणि ५ तरुणी छोट्या-छोट्या रूममध्ये नको त्या अवस्थेत अश्लील चाळे करताना पोलिसांना दिसून आल्या.

सदर कॅफेमध्ये महाविद्यालयीन मुले, मुली है कंपार्टमेन्टमध्ये पडद्याच्या आडोशाने बसून अश्लील कृत्य करताना मिळून आले. तसेच मागील खोलीमध्ये सोफ्यावर एक कपल बसूल अश्लील कृत्य करताना दिसून आले. काऊंटर उपस्थित असलेले नामे आकाश नारायण मोरे (२७, रा घाडेगांव ता. जि. जालना) आशिष विष्णु आंबेडकर (२३ वर्ष रा. भेलपुरी खु ता. जि. जालना) हे दोघे बसलेले दिसून आले. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता येणा-या जोडप्याची कोणताही प्रकारची माहिती किंवा नोंद त्यांचेकडे असलेल्या रजिस्टर मध्ये करत नव्हते. सदर जागेबाबत कॅफे चालविण्याच्या तसेच आतील भागामध्ये केलेल्या बदलाबाबत संबंधित विभागाची परवानगी नसल्याचे सांगितले.

त्याबाबत कॅफेची पाहणी केली असता त्यामध्ये एकूण ६ वेगवेगळ्या पद्धतीचे कम्पार्टमेंट करण्यात आलेली असून त्यामध्ये लाकडाचे आणि कापड्याच्या पडद्याव्दारे आडोसा तयार करण्यात आलेले होता. पोलिसांनी बोगस जोडप्याला तिथे पाठवले. त्या बनावट जोडप्याने दिलेली ५०० रुपयाची नोट काऊंटरमध्ये दिसून आल्याने पोलिसांची खात्री झाली. कॉफी सेंटरच्या नावाखाली त्याठिकाणी गैरकृत्य करण्यासाठी छोटया कम्पार्टमेन्ट ३०/४० मिनीटांसाठी दिल्या जात होत्या. पोलिसांनी पंचनामा करून कारवाई केली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक साहेब जालना, अपर पोलीस अधीक्षक साहेब जालना, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत महाजन महिला पोउपनि दिपाली शिंदे, पो. हे का, रामप्रसाद रंगे पोहे का. जगन्नाथ जाधव पो. हे का सोमनाथ उबाळे पो. अं. भरत ढाकणे आणि पो.अं. प्रदिप करतारे यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *