डोळ्यांची काळजी घेण्याबाबत नेत्रतज्ञ डॉ.मनोज भायगुडे यांचे मार्गदर्शन
️पंढरपूरमध्ये सर्वत्र सध्या डोळ्यांची साथ पसरतेय!
पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी!!️️
जाणून घ्या नेत्रतज्ञाकडून –
डोळ्यांच्या संसर्गाची लक्षणे व त्यावरील उपचार व घ्यावयाची काळजी!!!
—–
लक्षणे –
—–
डोळ्यांना चिकट पाणी येणे ,डोळे लाल होणे ,पापण्यांना सूज येणे, डोळ्यांची जळजळ होणे, डोळ्यात काहीतरी गेल्यासारखे जाणवणे, दिसण्यास अस्पष्टता येणे ,एका डोळ्याला सुरुवात होते व नंतर दोन्हीकडे लक्षणे जाणवतात, प्रकाशाची संवेदनशीलता,इत्यादी
डोळे येणे (Conjunctivits) हा एक संसर्गजन्य रोग आहे असून घाबरून जाण्याची गरज नाही त्वरित आपल्या नेत्रातज्ञांशी सम्पर्क साधा!
——
उपचार-
——
डोळ्यांना स्वच्छ कोमट पाण्याने धुणे,️ डोळ्यांना रुमाल , टॉवेल तसेच कोणत्याही प्रकारचे कापड इत्यादीने पुसू नये त्याचप्रमाणे डोळ्यांना सतत स्पर्श करू नये ,सर्वत्र वावरताना गॉगल चा वापर करावा.
हा एक संसर्गजन्य रोग असल्यामुळे घरात इतर व्यक्तींपासून लांब राहणे व इतर व्यक्तींचे टॉवेल रूमाल इ.वापर करू नये त्वरित नेत्रतज्ञांचा सल्ला घेणे.
—————
घ्यावयाची काळजी-
—————
डोळ्यांना स्पर्श करण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवा , तसेच डोळे चोळणे किंवा डोळ्यांना सतत स्पर्श करणे टाळावे. कुटुंबातील सदस्यांनी रुमाल सौंदर्यप्रसाधने शेअर करणे टाळा.
कॉन्टॅक्ट लेन्स चा वापर करत असल्यास डोळे आल्यावर लेन्स लावू नये.
डोळे येणे हे संसर्गजन्य असून सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे!!
डॉ. मनोज भायगुडे
M.S (NETRA)*